नितीशकुमार राज्यसभेकडे; बिहारमध्ये नेतृत्वबदलाची शक्यता, भाजपचा मुख्यमंत्री?

पटना: बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केल्याने बिहारमध्ये नेतृत्वबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नितीशकुमार राज्यसभेवर गेल्यास राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट […]

अधिक वाचा..

पत्र्याच्या घरातून राज्यसभेपर्यंत! गरिबी माझी कमजोरी नाही;  ज्योती वाघमारे यांचा संघर्षमय प्रवास

मुंबई: राज्यसभेच्या खासदारपदाच्या नव्या जबाबदारीसाठी सज्ज होत असताना शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या ज्योती वाघमारे यांनी आपल्या संघर्षमय आयुष्याचा आणि राजकीय प्रवासाचा भावनिक उलगडा केला. साध्या कुटुंबातून शिक्षण आणि सामाजिक कार्याच्या जोरावर राज्यसभेपर्यंत पोहोचण्यामागील प्रेरणा आणि अनुभव त्यांनी स्पष्टपणे मांडले. माझे वडील पँथर चळवळीचे बुलंद कार्यकर्ते होते आणि आजही ते तसेच आहेत. संघर्षाची जिद्द आणि सामाजिक […]

अधिक वाचा..

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा लढवावी लागणार आहे. या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. गांधी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची […]

अधिक वाचा..

राज्यसभा जागेवर काँग्रेसचा ठाम दावा; महाविकास आघाडीची निर्णायक बैठक

मुंबई: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी माध्यमांशी संवाद साधत आघाडीची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. बैठकीत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी […]

अधिक वाचा..

१६ मार्चला राज्यसभा रणधुमाळी; महाराष्ट्रातील ७ जागांसाठी महायुती-महाविकास आमनेसामने

मुंबई: भारत निवडणूक आयोग यांनी १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रातील सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान, तर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाणार आहे.महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळानुसार सातपैकी सहा जागा सत्ताधारी महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीत राज्यसभा जागेवरून रस्सीखेच; ठाकरेंकडून महिला नेत्याला संधीचे संकेत

मुंबई: मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (MVA) एकाच जागेवरून चुरस निर्माण झाली आहे. या जागेवर आपला दावा असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाकडे सर्वाधिक 20 आमदार असल्याचा दावा करत ही जागा शिवसेनेकडेच यावी, अशी भूमिका मांडली जात आहे. दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील या जागेसाठी […]

अधिक वाचा..

राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना गटातील भूमिका स्पष्ट

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटातही वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पूर्वी शरद पवार यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्यास त्यावर चर्चा करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना […]

अधिक वाचा..

राज्यसभेसाठी भाजपचं ‘धक्कातंत्र’ पुन्हा अ‍ॅक्टिव्ह? महाराष्ट्रातील ७ जागांवर मोठी राजकीय हालचाल

मुंबई: राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मार्चमध्ये मतदान होणार असून त्यापैकी ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजपचे चार उमेदवार सहज विजयी होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाजप यावेळी कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. २ एप्रिल २०२६ रोजी खालील सात खासदारांचा कार्यकाळ संपत आहे  Sharad Pawar (राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीवर राज्यसभेत मोठा दबाव, फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता

मुंबई: महाविकास आघाडीला राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा आव्हान उभं राहणार आहे. विधानसभेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आता थेट तीन खासदारकीच्या जागा आघाडीकडे जाण्याची शक्यता कमी झाली आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सात जागा रिक्त होत आहेत. यातील चार जागा महाविकास आघाडीकडे होत्या, पण विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे आता फक्त एकच उमेदवार विजयी होऊ शकणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ […]

अधिक वाचा..

गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित! धनदांडग्यांना लाभ नाही; चंद्रशेखर बावनकुळे

धाराशिव: राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार असून, शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द निश्चितपणे पाळला जाईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. वर्षानुवर्षे शेतात राबूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या गरीब शेतकऱ्यांसाठीच ही कर्जमाफी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे आयोजित सभेत बोलताना बावनकुळे म्हणाले […]

अधिक वाचा..