निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचपदी सविता करपे बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी सविता करपे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजू आळणे व ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांनी दिली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच महेंद्र रणसिंग यांनी त्यांच्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे सरपंचपद रिक्त झाल्याने नुकतीच […]

अधिक वाचा..

संदिप पडवळ यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या मॅनेजर पदी बढती

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील रहिवाशी संदिप सुदाम पडवळ यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅक कान्हूर मेसाई शाखा येथे बॅक मॅनेजर म्हणून बढती मिळाली आहे. पडवळ यांनी कोरेगाव भिमा, टाकळी हाजी, मलठण, कवठे येमाई या शाखेमध्ये कॅशियर म्हणुन उत्तम प्रकारे काम केले आहे. ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा दिल्यामुळे व त्यांची मॅनेजर पदी बढती झाल्याने […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयाच्या प्रभारी तहसिलदारपदी प्रशांत पिसाळ

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात तत्कालीन तहसिलदार लैला शेख यांची भ्रष्टाचाराबाबत अनेक लेखी पुराव्यानिशी तक्रारी झाल्याने त्यांची तडकाफडकी बदली झाली होती. त्यांची अचानक बदली झाल्याने त्यांच्या जागेवर रंजना उंबरहंडे यांनी प्रभारी तहसिलदार म्हणुन पदभार घेतला होता. त्यांच्या काळात चार्ज घेतल्यापासून आजपर्यंत गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेस, पुर्नवसन केसेस, वतन जमिनीच्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश चिटणीसपदी डॉ. वर्षा शिवले

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वर्षा शिवले यांची नुकतीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी डॉ. वर्षा शिवले यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वर्षा शिवले या राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असून […]

अधिक वाचा..

पुणे-नगर रोड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मेजर तुकाराम डफळ

मांडवगण फराटा (संपत कारकुड): माजी सैनिकांच्या अनेक समस्या आहेत. सरकारी कामामध्ये सैनिकांना मान-सन्मान मिळत नसून रिटायर होऊन आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं परंतु सैनिकांच्या अडचणी कोणीच समजून घेत नाहीत. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मेजर तुकाराम डफळ यांनी केले. पुणे-नगर रोड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नुकतीच माजी सैनिक तुकाराम […]

अधिक वाचा..

मानव विकास परीषदेच्या युवक कार्याध्यक्षपदी शहाजी खळदकर

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथील शहाजी संतू खळदकर यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुका युवक कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असून, सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाज्यातील भांडवलशाहीकडून […]

अधिक वाचा..

शिक्रापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी करंजे तर सचिवपदी डॉ. भोसुरे

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली असून यावेळी रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या अध्यक्षपदी वीरधवल करंजे तर सचिव डॉ. मिलिंद भोसुरे यांची निवड करण्यात आली असून मावळत्या पदाधिकाऱ्यांकडून दोघांनी देखील पदभार स्वीकारला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसाच्या संस्कार गावडेची नवोदय साठी निवड

शिक्रापूर: पिंपळे खालसा (ता. शिरुर) या महाराष्ट्रातील शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संस्कार अविनाश गावडे या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली असून संस्कारच्या यशामुळे शाळेने यशाची परंपरा कायम राखली. संस्कार गावडे सह त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिक सुशीला माकर व दिनेश निघोजकर यांचा शालेय व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थ व शिक्षकांनी सन्मान केला. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी धुमाळ

शिक्रापूर: शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी संभाजी धुमाळ तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक ज्येष्ठ माजी सैनिक शिवाजीराव कोहोकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी सैनिक संघटनेच्या शिरुर तालुकाध्यक्ष पदी संभाजी धुमाळ, […]

अधिक वाचा..

मानव विकास परीषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी संगिता रोकडे यांची निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता नामदेव रोकडे यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असुन सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपुर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाजातील भांडवलशाहीकडून पैशाच्या व […]

अधिक वाचा..