शिरुर तालुका यशवंतराव चव्हाण सेंटरच्या समुपदेशकपदी राणी कर्डिले

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुका हा लोकसंख्येने मोठा तालुका असुन तालुक्यात महिलांच्या अनेक समस्या असतात. त्या सोडविण्यासाठी समुपदेशक म्हणून राणी कर्डीले यांची निवड करण्यात आली. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

 

राणी कर्डीले या गेल्या अनेक वर्षांपासुन सामाजिक कामात अग्रेसर असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या दक्षता कमिटीच्या अध्यक्षा म्हणुन काम करत असताना त्यांनी दोन वर्षात महिलांच्या अनेक कौटुंबिक समस्यांचे निराकारण केले. तसेच रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कर्डीले यांनी शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या युवती तसेच महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.

 

यावेळी शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास ढमढरे, शिरुर शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, शिरूर तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा विद्या भुजबळ, शिरुर राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष तुषार दसगुडे, उपाध्यक्ष केशव शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला शहरध्यक्षा डॉ स्मिता कवाद, संगिता शेवाळे, राणी शिंदे, दिपाली आंबरे, छाया हारदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यशवंतराव चव्हाण समुपदेशक सेंटरच्या वतीने शिरुर तालुक्यातील महिलांच्या कौटुंबिक अडचणी मोफत सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. त्यामुळे महिलांना मानसिक आधार मिळणार आहे. तसेच शिरुर तालुक्यातील कोणत्याही महिला भगिणीवर अत्याचार, अन्याय होत असेल तर त्यांनी 8329044177 या नंबरवर संपर्क करावा.

राणी कर्डीले (समुपदेशक)

यशवंतराव चव्हाण सेंटर, शिरुर