मानव विकास परीषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी संगिता रोकडे यांची निवड

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता नामदेव रोकडे यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे.

मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असुन सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपुर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाजातील भांडवलशाहीकडून पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय आधिकाराचा गैरवापर करत शोषित आणि श्रमिक तसेच मागसवर्गीयांवर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयात होणारी पिळवणुक, मानवी हक्कांचे होत असलेले उल्लंघन याबाबत समाज्यातील पीडित लोकांना न्याय देण्यासाठी मानव विकास परीषद हि संस्था काम करत आहे.

unique international school
unique international school

मानव विकास परीषदेचे संस्थापक, अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांच्या आदेशाने आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक चौधरी, राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब लोंढे, प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर, प्रदेश सचिव डॉ सचिन सूर्यवंशी, प्रदेश कार्याध्यक्ष असलम सय्यद, युवा प्रदेशाध्यक्ष अंकुर कदम, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा जयश्री अहिरे, राष्ट्रीय संपर्कप्रमुख अन्सार शेख, संस्थेचे खजिनदार अलीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विकास परीषदेच्या माध्यमातून शिरुर तालुक्यात तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संगिता रोकडे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.