कासारीतील कुटुंब लग्नाला तर चोरट्यांचा घरात डल्ला

दरवाजाचे कुलूप तोडून लांबवला तब्बल चार लाखांचा ऐवज शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील कुटुंब शेजारील मुलीच्या लग्नासाठी कोरेगाव भीमा येथे गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून तब्बल 4 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कासारी (ता. शिरुर) अमित सातपुते […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कामगार दिनी आदर्श कामगारांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): 1 मे या कामगार दिनी कामगारांचा सन्मान होणे गरजेचे असल्याने नुकतेच लोक जनशक्ती पार्टी लेबर सेल व जनशक्ती मजदूर सभा यांच्या वतीने संघर्षमय कार्य करत आपल्या कामातून आदर्श निर्माण करणाऱ्या कामगारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे लोक जनशक्ती पार्टी लेबर सेल व जनशक्ती मजदूर सभा यांच्या वतीने […]

अधिक वाचा..

करंदीत मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील किनारा हॉटेलच्या आडोशाला सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत कारवाई करुन मटक्याचे साहित्य जप्त करत सोमनाथ नारायण सोनवणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील किनारा हॉटेलच्या आडोशाला एक व्यक्ती कल्याण मटका नावाचा मटका चालवून नागरिकांना कागदावर आकडे लिहून देत असल्याची माहिती पोलीस […]

अधिक वाचा..

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी सुटणार; मिळणार नवीन मार्ग…

पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरुर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग प्रस्तावित केला असल्यामुळे मराठवाडा तसेच शिरुरमधून येणाऱ्या वाहतुकीला मुंबईला जाण्यासाठी नवीन मार्ग मिळणार आहे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. पुण्यात येणारी वाहतूक शिरुर-खेडमार्गे थेट कर्जतला जाणार आहे. यामुळे वेळेची बचत तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. मराठवाडामधून येणाऱ्या वाहनांना सध्या मुंबईला […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या विद्याधामच्या अठरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

राष्ट्रीय शिष्यवृत्तीस दोन व सारथीसाठी सोळा विद्यार्थी लाभार्थी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केले असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत दोन तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत सोळा विद्यार्थी पात्र ठरलेले असताना यापैकी राष्ट्रीय शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 5 वर्षे दरवर्षी 12 हजार तर सारथी शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 4 वर्षे दरवर्षी 9 हजार […]

अधिक वाचा..

बुरुंजवाडी गावचा शिक्रापूर पोलीस स्टेशनला समावेश

शिक्रापूर (शेरखान शेख): रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या बुरुंजवाडी गावचा समावेश गावापासून जवळच असलेल्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करण्याची ग्रामस्थांची मागणी होत असताना नुकतेच बुरुंजवाडी गावचा शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत समावेश करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या बुरुंजवाडी गावचा समावेश रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन स्थापन झाल्यानंतर […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायतचे राजकारण वेगळ्या वळणावर

मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र आल्याने तर्कवितर्क शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायत मध्ये सरपंच बांदल गटाचा तर उपसरपंच मांढरे गटाचा अशी स्थिती असताना नुकतेच मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र आलेले असताना उपसरपंच पदाच्या निवडणुकीवेळीच अचानक सरपंच रुग्णालयात दाखल झाले असल्याने शिक्रापूरचे राजकारण वेगळ्या वळणावर पोहचून मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील बावीस वर्षीय युवती बेपत्ता

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील 22 वर्षीय युवती घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली असल्याने बेपत्ता युवतीच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस येथे खबर दिली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाव्हळ हॉस्पिटल परिसरात राहणारी श्रुती कांबळे या युवतीचे वडील कामाला गेले असताना श्रुतीचा घरात मोबाईल वरून भावासह वाद झाला. त्यानंतर रात्री […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा बनला पोलीस

भटक्या समाजातील युवकाने दिला युवकांना अनोखा संदेश शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपूर्वी भटक्या समाजातून वास्तव्यास आलेल्या परिवारातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा रोहित तुळजाराम माने परिस्थितीवर मात करत पोलीस दलात भरती झाला, तर भटक्या समाजातील युवकाने जिद्दीचा अनोखा संदेश दिला असल्याने त्याच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भटक्या गोंधळी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर येथे सेकंडरी पतसंस्थेची नव्याने शाखा सुरु

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉ. को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई या पतसंस्थेची नव्याने शाखा सुरू करण्यात आलेली असून मोठ्या दिमाखात सदर पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉ. को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई या पतसंस्थेच्या शाखेचे उदघाटन पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च […]

अधिक वाचा..