शिक्रापूर येथे सेकंडरी पतसंस्थेची नव्याने शाखा सुरु

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉ. को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई या पतसंस्थेची नव्याने शाखा सुरू करण्यात आलेली असून मोठ्या दिमाखात सदर पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉ. को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई या पतसंस्थेच्या शाखेचे उदघाटन पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी मार्गदर्शन करताना संस्थेची सांख्यिकी आकडेवारी सांगत, शिक्रापूर शाखेत सभासद वाढविण्यासाठी शाळा भेटीवर लक्ष देवून सभासद संख्या 1 हजार च्या वर करावी, असे आवाहन केले.

यावेळी संचालक भाऊसाहेब आहेर यांनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था चांगला कारभार करत आहे असे मत मांडले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नंदकुमार सागर होते तर यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, राज्य टि. डी. एफ. संघटनेचे समन्वयक दादासाहेब गवारे, दौण्ड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामचंद्र नातू, शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, रामनाथ इथापे यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी दत्तात्रय रोकडे, दिलीप फापळ, तानाजी मेमाणे, नानासाहेब थोरात, शिरुर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी ठुबे, गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष कल्याण कडेकर, मुख्याध्यापक अरुण गोरडे, संजीव मांढरे, शिरुर तालुका शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव गवारे, प्रकाश चव्हाण, प्रविणकुमार जगताप, शिक्षक परीषदेचे तालुका अध्यक्ष अशोक दहिफळे, मोहन ओमासे, संभाजी कुटे, अंबादास गावडे, रविंद्र चौधरी, जालिंदर आखाडे, अविनाश कुंभार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गरुड यांनी केले तर प्रास्ताविक भाषणात तज्ञ मार्गदर्शक गुलाबराव गवळे यांनी केले आणि शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व पालक संचालक तुकाराम बेनके यांनी आभार मानले.