hsc sambhajiraje vidyalay

संभाजीराजे विद्यालयात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत…

शिक्रापूरः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. २१) सुरू झाली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी शिरूर तालुक्यातून एकूण ४६७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. तालुक्यात बारावीची एकूण ६ मुख्य केंद्र आहेत, अशी माहिती केंद्रसंचालक प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. मौजे जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयात […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याचा विहीरीत पडून मृत्यू…

टाकळी हाजी (अरुणकुमार मोटे): चांडोह (ता. शिरूर) येथील शेतकरी भानुदास गणपत गाडगे हे आज (शुक्रवार) पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास शेतातील कांदयाला पाणी देण्यासाठी गेला असताना शेतातील विहीरीत पडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, चांडोह (ता. शिरूर) येथे भानुदास घाडगे यांची शेतजमिन गट नं. ५८/१/अ मध्ये तीन एकर शेत जमीन […]

अधिक वाचा..
afsar-shaikh-nilesh-darekar

शिरूर तालुक्यात मानव विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर पुन्हा गुन्हा दाखल…

सणसवाडीत कंपनीची तक्रार करत मागितली ठेका रुपात खंडणी शिक्रापूर (प्रतिनिधी): सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनीला मानव विकास परिषदेचे लेटरहेड देत नंतर एचआर मॅनेजरला धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख व पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर यांच्या विरुद्ध पुन्हा खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी […]

अधिक वाचा..

पुणे-अहमदनगर महामार्गावर विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू…

पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसन येथे स्विफ्ट कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात झाला. यामध्ये आणखी एका युवकाचा मृत्यू झाला आहे. स्विफ्ट कार आणि […]

अधिक वाचा..
zp school warude

विद्यार्थ्यांचे कल्याण यातच शिक्षकाचे समाधान: सुर्यकांत बढे

शिक्रापूरः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुडे येथील १९९९ सालची इयत्ता सातवी च्या बॅचचे रविवारी (ता. २१) तब्बल चोवीस वर्षांनी स्नेहसंमेलन संपंन्न झाले. यावेळी चोवीस वर्षापूर्वी एकत्र शिकलेली, खेळलेली सर्व मुले-मुली आपल्या मुलांसह एकत्र जमले होते. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जिवनातील आठवणींना यावेळी उजाळा दिला. सातवीपर्यंतचे वर्गशिक्षक सुर्यकांत बढे गुरुजी व आठवी ते दहावी चे वर्गशिक्षक […]

अधिक वाचा..
jategaon-scholarship-student

जातेगावचे १० विद्यार्थी चमकले शिष्यवृत्ती परीक्षेत…

शिक्रापूरः जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक विद्यालयातील १० विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत, अशी माहिती प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. विद्यालयातील जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे – आर्या सचिन तुपे (२४६) साक्षी सचिन इंगवले (२३४) प्रणय दत्तात्रेय मासळकर (२३०) आदित्य प्रभाकर भिसे (२२४) श्रीनाथ सुभाष बगाटे (२२०) विश्वजीत राहुल […]

अधिक वाचा..
ranjangaon midc police

रांजणगाव एमआयडीसीत फिरणाऱ्या निराधार महिलेस मिळाला हक्काचा निवारा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रांजणगाव एमआयडीसी परिसरात निराधार मनोरुग्ण अवस्थेत फिरणाऱ्या महिलेस रांजणगाव एमआयडीसी पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हक्काचा निवारा मिळाला आहे. याबाबत सविस्तर असे की, रांजणगाव एमआयडीसी येथील फियाट कंपनी येथील गेट नंबर १ परिसरात एक महिला गेल्या काही दिवसांपासून निराधार व बेवारस स्थितीत आढळून आली होती. अचानक वाढलेली थंडी तसेच सदरील महिला […]

अधिक वाचा..
pimple dhumal zp school

पिंपळे खालसा शिष्यवृत्ती पॅटर्न महाराष्ट्रात अव्वल; पाहा विद्यार्थ्यांची नावे…

शिक्रापूर: पिंपळे खालसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ५२ वर्षांची शिष्यवृत्ती यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचे ५००हून अधिक विद्यार्थी शिष्यवृ्ती धारक झाले आहेत. यावर्षी जाहिर झालेल्या निकालानुसार शाळेचे दोन विद्यार्थी राज्यगुणवत्ता यादीमध्ये तर २३ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणेः इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतिम निकाल […]

अधिक वाचा..
Tanaji Dharne

आंबळे येथील तानाजी धरणे यांचे ‘हेलपाटा’ कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर…

शिरूरः शिरूर तालुक्यातील आंबळे गावचे सुपुत्र आणि रायगड जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले तानाजी धरणे यांची हेलपाटा ही कांदबरी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने… तानाजी धरणे हे आमच्या गावात जन्माला आलेलं आणि तावून सुलखून निघालेलं बावनकशी सोनं आहे. आत्तापर्यंतचा त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास सृजनशील कवी/गीतकार म्हणून पाहिला आहे. त्यांचे काही कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत तर […]

अधिक वाचा..
sima thite

काठापूर खुर्द ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी सिमा थिटे यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चुरशीच्या ठरलेल्या बेट भागातील काठापूर खुर्द ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी सिमा थिटे यांची निवड झाली. लोकनियुक्त सरपंचपदासाठी झालेल्या जागेसाठी मुक्ताईदेवी ग्रामविकास पॅनेलकडून सिमा बिपीन थिटे यांनी तर जय हनुमान ग्रामविकास पॅनेलकडून कांताबाई यशवंत दिघे यांनी आपले नामनिर्देशन अर्ज सादर केले होते. यामध्ये सात सदस्य कार्यकारिणी असलेल्या या ग्रामपंचायतसाठी एकूण पाच जागेसाठी […]

अधिक वाचा..