ramdas-thite-traffic

सिध्दीविनायक स्कूलच्या वतीने वाहन चालकांचा सन्मान…

शिरूर तालुका

शिक्रापूर: जागतिक वाहन चालक दिना निमित्त वर्षभर करत असलेल्या कामाची दखल घेत सिध्दीविनायक स्कूलच्या वतीने वाहन चालकांचा सन्मान करण्यात आला. यामुळे वाहन चालक पंकज वाघोले यांच्या चेहर्‍यावर वेगळा आनंद ओसंडून वाहत होता.

कामगार, कष्टकरी, श्रमिक या भूमिका पार पाडणारा वाहन चालक शिक्षण क्षेत्रातील मुलांना काका या नावाने परिचित आहेत. १७ सप्टेंबर हा जागतिक वाहन चालक दिवस. यानिमित्ताने श्री सिद्धीविनायक पब्लिक स्कूल, शिक्रापूरच्या वतीने शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकांचा पालकांनी गुलाबपुष्प, शाल व भेटवस्तू देऊन सन्मान करावा, असे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत चाकण रोड परिसरातील विद्यार्थी यशराज थिटे व पालक रामदास थिटे यांनी वाहन चालक पंकज वाघोले व वहातुक सहाय्यक यांचा सन्मान केला.

वर्षभर शालेय मुलांची सुरक्षितता, प्रत्येक थांब्यावर चढ – उतार यासंबधी काळजी घेणारे हे घटक म्हणजे व्यवस्थापन विभागाचा आत्माच आहे. विद्यार्थी व शाळेप्रती त्यांच्या भावना जोपासणे प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे. सिद्धीविनायक प्रशालेच्या या उपक्रमास संस्था अध्यक्ष सोमनाथ सायकर व प्राचार्य गौरव खुटाळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

योगासनाला जीवनाचा भाग करून घेणे गरजेचे; प्रा. रामदास थिटे

प्राचार्य रामदास थिटे यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार!

व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन गरजेचे; रामदास थिटे