शिरुर तालुक्यात चारचाकी गाडी अडवून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील मयुर लॉन्स मंगल कार्यालयातील लग्न समारंभ उरकुन चारचाकी गाडीने घरी जात असताना दुचाकी गाडीवरुन आलेल्या तीन जणांनी चारचाकी गाडी अडवत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच चारचाकी गाडीवर दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्याने यात चारचाकी गाडीतील एकजण जखमी झाला असुन याबाबत दादाभाऊ महादेव घेगडे (वय 37) […]

अधिक वाचा..

…तर सर्व खुळचट नामर्दांना पळता भुई थोडी होईल; शीतल करदेकर 

मुंबई: घोर कलियुग आणि कलियुगाची अतिउच्च परिसीमा काय असते. हे सध्या वर्तमानात आपण अनुभवतोय. देखल्या देवा दंडवत, बोलबच्चनगिरी, इव्हेंट यात सच्चाई लपून जात आहे आणि हम करे सो कायदा म्हणणारे, पुढे पुढे मिरवणारे यांचीच चलती होताना दिसत आहे. मात्र या सगळ्यात ‘सच्चाई’ ला आणि आपल्या ‘जन्मसिद्ध जगण्याच्या अधिकाराना, आपल्या सन्मानाला जागा उरलेली दिसत नाही. हे […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरात स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट व स्टोरी ठेवून दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने याबाबत रेहान असिफ काझी या युवकांवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान असिफ काझी व इतर चार इतर अल्पवयीन मुलांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट व स्टोरी […]

अधिक वाचा..

सरदवाडी ग्रामस्थांच्या मदतीमुळे जखमी वृद्ध व्यक्तीस मिळाले वेळेवर उपचार

कारेगाव (बाळासाहेब जाधव) सरदवाडी येथे (दि 7) रोजी नगर-पुणे रोड येथे माणिकचंद कंपनी शेजारी पायी प्रवास करीत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने एक वृद्ध व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली असताना एका जागरूक नागरिकाने पाहिले. त्यानंतर त्याने काही ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी तातडीने 108 ला फोन करुन रुग्णवाहिका बोलावून संबंधित व्यक्तीस पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवून दिले. ग्रामस्थांनी […]

अधिक वाचा..

पुण्यात महसूलच्या अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचे ‘घबाड’ ! पैसे मोजताना CBI च्या अधिकाऱ्यांची दमछाक

पुणे (प्रतिनिधी) पुण्यात अनेक अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडले आहेत. नुकतेच वाघोली येथे तलाठी कार्यालयातील दोन मदतनीस यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील महसूलचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना 8 लाखांची लाच घेताना शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर अनिल रामोड यांच्या पुण्यातील आणि नांदेड येथील घराची […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलिसांकडुन अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होईना, दबंग आधिकाऱ्याची शिरुर पोलिस स्टेशनला गरज…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे रस्त्याच्या कडेला एक पेट्रोल टाकुन एक जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून पाच दिवसात तपास करुन त्यातील आरोपी पकडण्यासाठी शिक्रापूर पोलिस तसेच गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांना अथक परीश्रम करत यश आले आहे. नात्याला काळीमा फासणारी हि घटना घडली असुन मृताची बायको आणि अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकराच्या […]

अधिक वाचा..

वाघाळे विविध विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत बढे तर उपाध्यक्षपदी विकास कारकूड यांची बिनविरोध निवड 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): वाघाळे (ता. शिरुर) येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत बढे तर उपाध्यक्षपदी विकास कारकूड यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन यापूर्वीचे अध्यक्ष दिलीप थोरात तसेच उपाध्यक्ष विश्वनाथ कारकूड आपल्या पदांचा रजिनामा दिल्याने गुरुवार (दि 8) जुन रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी निवडणुक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी सूर्यकांत बढे तर उपाध्यक्ष […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महिला वस्ती गृहांचे सुरक्षा ऑडीट व तपासणी करा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी 

शिरुर (तेजस फडके): नुकतीच महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वस्ती गृहामध्ये एका मुलीचा बलात्कार करुन खून झाल्याची घटना घडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहे तसेच खासगी महिला वस्तीगृहे या मध्ये नियमानुसार सी सी टी वी, महिला सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी आणि स्थानिक पोलीस स्टेशन चा नंबर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने विद्युत तारा व खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

शिरुर (तेजस फडके): शिरुर परीसरात काल गुरुवार (दि. 8) रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. सोने सांगवी, ढोकसांगवी, रांजणगाव, कारेगाव, फलके मळा, करंजावणे, गणेगाव परिसरात पावसाबरोबरचं वाऱ्यांचा जोर खुप होता. याबाबत कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सांगितले की विजेचे खांब पडल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. शिरुर तालुक्यात सूरु असलेल्या वादळी वाऱ्यामुळे […]

अधिक वाचा..

…तर निलेश राणेसह भाजपने महाराष्ट्राची व राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर माफी मागावी

मुंबई: निलेश राणेने केलेल्या ट्वीटला नारायण राणे तुम्ही सहमत आहात का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हे ट्वीट मान्य आहे का? या ट्वीटशी भाजप सहमत आहे का? राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ट्वीटबाबत काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे. जर हे ट्वीट मान्य नसेल तर निलेश राणेसह भाजपने महाराष्ट्राची व राष्ट्रवादी काँग्रेसची […]

अधिक वाचा..