शिक्रापूरच्या उपसरपंचावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच विशाल पांडुरंग खरपुडे व वैभव पांडुरंग खरपुडे या दोघांवर एका महिलेकडून बिल्डींग मटेरियल खरेदी करुन तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच विशाल खरपुडे यांनी यापूर्वी छाया मोरे यांच्याकडून बांधकाम साठी लागणाऱ्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बापानेच केला नववीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा बापाने विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नराधम बापावर विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील नववीत शिक्षण घेणाऱ्या मुलीची आई कामावरून आलेली असताना मुलगी रडत असल्याने आईने रडण्याचे कारण विचारले असता तिने मी झोपल्यानंतर वडील जवळ […]

अधिक वाचा..

जाणून घ्या तुमच्यासाठी तुमचा आजचा दिवस कसा असेल…

मेष: आज तुम्ही खूप व्यस्त असाल आणि संपूर्ण दिवस काही ना काही व्यवस्था करण्यातच जाईल. नोकरदार लोकांना कामाच्या संदर्भात खूप धावपळ करावी लागेल. काही बाबतीत ऑफिसमध्ये तुमची चौकशी होऊ शकते. दुसरीकडे, व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला असेल. तुमचा ज्यात स्वाभिमान वाढेल अशाच गोष्टी करा. वृषभ: तुमचा आजचा दिवस काही बाबतीत शुभ तर काही बाबतीत अशुभ […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत पती व सासऱ्याकडून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून एका महिलेच्या पती व सासऱ्याने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चंद्रकांत नारायण गवारे, कुणाल चंद्रकांत गवारे व धनश्री विजय गवारे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील कांचन गवारे यांचे घरगुती वाद झालेले असल्याने महिला माहेरी गेलेली […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

तिघा युवकांकडून पिस्तूल तलवार चाकू दोरी सह साहित्य जप्त शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस पथक २१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना एका ठिकाणी दरोड्याच्या तयारीतील युवक थांबल्याची माहिती मिळाली असता पोलिसांच्या पथकाने सदर युवकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार, कोयता, चाकू, मिरची पूड जप्त करत विकी उर्फ विवेक उर्फ […]

अधिक वाचा..

तमाशा पहायला गेला अन् घरी चोरट्याने साधला डाव…

शिरुर (अरुणकुमार मोटे): मांडवगण फराटा येथील ज्ञानोबा संताराम शेरे यांचा मुलगा श्याम हा मांडवगण फराटा येथे तमाशा पहाण्यासाठी गेला असता त्याला घरी यायला उशीर होईल म्हणुन खोलीचा दरवाजा ढकलुन दरवाजाची कडी न लावता कुटुंब झोपी गेलो असता चोरट्यांनी डाव साधत घरातील ७०, ००० रु. रोख रक्कम व सोन्याचे २ तोळयाचे दागिणे मिळून तब्बल १, ७०, […]

अधिक वाचा..

प्रेम प्रकरणावरून एकास शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे): न्हावरे -उरळगाव रोडवर अशोक विनायक साञस याला निमोने (ता. शिरूर) येथील मुलीबरोबर तुझे प्रेमकरण आहे मग तु खोटे का बोलला? असे म्हणत आरोपी समिर शेलार रा. निमोने वत्याचा साथीदार नाव व पत्ता माहीत नाही. यांनी अशोक सात्रस याला लाकडी दांडक्याने, दगडाने मारहाण करत शिविगाळ केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. […]

अधिक वाचा..

शिरूर शहरातून डिझायर कारची चोरी …

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून रेव्हेन्यू कॉलनी येथून मारुती कंपनीची डिझायर कार सोमवारी (दि. २०) रात्री चोरीला गेली आहे. पुण्यातील कात्रज येथील मनिषा धनंजय पवार या नोकरी निमित्त शिरूर मधील रेव्हेन्यू कॉलनी येथे राहत असून सोमवारी रात्री 9 वाजता त्यांची गाडी रोडच्या कडेला लावली होती. त्यांनी मंगळवारी सकाळी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्यांची शिक्रापूर पोलिसांकडून धिंड…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार वेगवेगळे गुन्हे करून तसेच वेगवेगळे हत्यार वापरून त्याचे व्हिडिओ तयार करून इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर प्रसारित करून दहशत माजवणाऱ्या आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी एका गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास […]

अधिक वाचा..

सतत फोन चेक करण्याची सवय असेल तर सावध राहा…

तुमच्या मेंदूवर होतोय दुष्परिणाम…  औरंगाबाद: आजकाल स्मार्टफोन ही काळाची गरज असली तरी त्याच्या वापराचे अनेक दुष्परिणामही असल्याचे अनेक संशोधनातुन समोर आलं आहे. यातीलच एक मोठा दुष्परिणाम म्हणजे मेंदूवर (Brain) होणारा वाईट परिणाम. होय, हे खरं आहे. वारंवार फोन चेक करण्याची सवय ही मेंदूसाठी घातक ठरु शकते. सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने वारंवार स्मार्टफोन तपासल्याने मेंदूवर होणाऱ्या परिणामांवर […]

अधिक वाचा..