शिरुर तालुक्यात हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करत वृद्ध दाम्पत्याला गंभीर मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे) सविंदणे (ता.शिरुर) येथील सविंदणे-कवठे रस्त्यावरील नरवडे मळा येथे (दि. ६ ) रोजी पहाटे अंदाजे १.३० ते २.१५च्या दरम्यान चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी संभाजी नरवडे यांच्या घराचा दरवाजा ऊचकटून संभाजी नरवडे व त्यांच्या पत्नी बबूबाई नरवडे यांना जबर मारहाण करत बबूबाई यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र, मोहन माळ, जोडवी, कानातील कर्णफुले असा अंदाजे […]

अधिक वाचा..

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत सैनिक समाज पार्टीच्या जोरदार मुसंडी मारणार:- ॲड शिवाजी डमाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आपला देश स्वतंत्र झाला आहे पण व्यक्ती स्वतंत्र नाही…? प्रस्थापित घराणेशाही हि प्रत्येक पक्षाच्या विनाशास कारणीभूत आहे. समाजातील भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांच्या दबावातून समाजातील सर्वसामान्य नागरीकांना बाहेर काढण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे बौध्दिक आंदोलन आहे असे मत ॲड शिवाजी डमाळे यांनी व्यक्त केले. रांजणगाव गणपती येथील हॉटेल संदीप या ठिकाणी […]

अधिक वाचा..

कोंढापुरी येथील संगिता पिटर यांची आझाद समाज पार्टीच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) कोंढापुरी (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्त्यां संगिता प्रफुल्ल पिटर यांची आझाद समाज पार्टीच्या महिला आघाडीच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. संगिता पिटर यांनी यापुर्वी शिरुर तालुक्यात अनेक सामाजिक कामात सहभाग घेतला आहे. या निवडीनंतर बोलताना पिटर म्हणाल्या, आझाद समाज पार्टी महिला आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्ष स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील दुर्बल […]

अधिक वाचा..

आझाद समाज पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेखा गायकवाड यांची निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्त्यां सुरेखा सुरेश गायकवाड यांची आझाद समाज पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. सुरेखा गायकवाड यांनी यापुर्वी आझाद समाज पार्टीच्या शिरुर तालुकाध्यक्षा म्हणुन काम केले आहे. सुरेखा गायकवाड या नेहमीच शिरुर तालुक्यात महिलांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत असतात. तसेच आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून […]

अधिक वाचा..

शिरुर येथील डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि अत्याधुनिक उपचारामुळे असाध्य आजारावर रुग्णाने केली मात

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर येथील श्री गणेशा हॉस्पिटल मध्ये प्रगत अत्याधुनिक उपचार तसेच डॉक्टरांनी घेतलेले अथक परिश्रम यामुळे असाध्य आजारावर रुग्णाला योग्य उपचार देत तब्बल १९ दिवस व्हेंटिलेटर वर ठेवूनही रुग्णाला बरे करण्याची किमया डॉक्टरांनी साधली आहे. याबाबत शिरुर येथील श्री गणेशा हॉस्पीटलचे डॉ अखिलेश राजुरकर यांनी शिरुर येथे पत्रकार परीषदेमध्ये हि माहिती दिली. याबाबत […]

अधिक वाचा..

शिरुर; भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची अवैध धंद्यावरुन जुंपली, एकाचे पोलिसांवर आरोप तर दुसऱ्याकडुन पाठराखण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात राजरोजपणे अवैध धंदे सुरु असल्याने भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांनी शनिवार (दि 3) रोजी शिक्रापुर येथे पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले. तर भाजपाचे शिरुर बेट मंडलचे माजी अध्यक्ष सतिश पाचंगे यांनी जयेश शिंदे यांचे […]

अधिक वाचा..

शिरुरच्या नवनिर्वाचित पोलिस निरीक्षकांपुढे कायदा सुव्यस्था राखण्याचे मोठे आव्हान

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांची निवडणुक आयोगाच्या नियमावलीमुळे नुकतीच सहा महीन्याच्या बदली झाली. त्यांच्या जागी ज्योतीराम गुंजवटे यांनी नवनियुक्त पोलिस निरीक्षक म्हणुन पदभार स्वीकारला आहे.   त्यांनी यापुर्वीच २०१०ते २०११या कालावधी मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणुण शिरुर पोलिस स्टेशनला काम केले होते. तब्बल बारा वर्षांनी त्यांची पुन्हा शिरुर पोलिस […]

अधिक वाचा..

व्हिडीओ:- घोड धरणात रात्रीस वाळू उपशाचा चालतोय खेळ, प्रशासन सुस्त आणि वाळू चोर मस्त…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात घोड धरणात शासनाने निमोणे आणि चिंचणी या ठिकाणी वाळू डेपो उभारलेले असताना वाळू ठेकेदार हा स्वतःच्याच नातेवाकाच्या नावाने बुकिंग करुन 4500 ते 5000 रुपये ब्रासने अनधिकृत वाळूची विक्री करत आहे. तसेच चिंचणी आणि गुनाट परीसरात आता नवीन वाळू माफिया उदयाला येत असुन त्यांनी घोड धरणातून रात्रीच्या वेळेस वाळू उपसा करण्याचा […]

अधिक वाचा..

शिरुरच्या सराफावर बंदुकीने हल्ला करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात असणाऱ्या जगन्नाथ कूलथे सराफ पेढीवर दोन दिवसांपूर्वी दोघा तरुणांनी सशस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केला होता. त्यावेळी या पेढीचे मालक अशोक कुलथे हे स्वतः दुकानात होते. त्यांच्या सोबत कामगार भिकाजी पंडित (वय ५०) हे कामगार देखील होते. रात्री दुकान आवरण्याची लगबग सुरु असताना अचानक दोघे तरुण दुकानात शिरले आणि बंदुकीचा धाक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बॅटरीवरच्या चारचाकीचा अपघात; नशीब बलवत्तर म्हणुन चालक बचावला…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील बसस्थानका जवळ आज (दि 31) रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास बॅटरीवर चालणाऱ्या महिंद्रा चारचाकी गाडीला अपघात झाला. गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने आणि गाडीने वेग घेतल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दगडांच्या डिगाऱ्यावरुन समोरच असणाऱ्या काटेरी झाडाला धडकून झाडात अडकली. सुदैवाने या गाडीत मालक अमोल मुखेकर […]

अधिक वाचा..