बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुखपदी बाप्पुसाहेब शिंदे यांची नियुक्ती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील सुपुत्र बाप्पुसाहेब शिंदे यांची नुकतीच बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुखपदी निवड झाली असुन शिरुर-हवेली तसेच हडपसर विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रासाठी बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुख म्हणून त्यांना शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे झालेल्या बैठकीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. […]

अधिक वाचा..

शिवसेनेच्या नादाला लागल्यास विरोधकांना नेस्तनाबूत करु….

मुंबई: शिवसेनेच्या नादाला लागल्यास विरोधकांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला संबोधित करताना दिला. शिवसेना मेळाव्याला येणाऱ्या काही शिवसैनिक महिलांना नाशिक येथे अश्लिल हावभाव करुन त्यांचा विनयभंग करणाऱ्या विरोधकांना महिला शिवसैनिकांनी अद्दल घडवली. त्या महिला शिवसैनिकांचे अभिनंदन करताना विरोधकांना दानवे यांनी हा इशारा दिला. […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ सुरु…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि शिवसेना सभासद नोंदणीचा शुभारंभ मोठया थाटात चांडोह, फाकटे, वडनेर, पिंपरखेड, मलठण, केंदूर, करंदी, पाबळ, जातेगाव या ठिकाणी करण्यात आला. तसेच पिंपरखेडचे उपसरपंच यांनी या कठीण काळात शिवसेनेला साथ देत त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात प्रत्येक गावात ही मोहीम जोरदारपणे […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात-पाय तोडण्याची धमकी…

खेड (पुणे) : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. लांडेवाडी येथील घरी जाऊन हात-पाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी 17 जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार: आढळराव पाटील

शिरूर (शेरखान शेख): शिवसेनेतून झालेली हकालपट्टी आणि हकालपट्टी मागे घेतल्याच्या प्रकरणाबाबत व आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत लवकरच आपण थेटपणे जाहीर बोलणार आहोत, असे शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनतर शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याने त्यांची […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील शिवसेनेची कारवाई मागे…

मुंबई : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. पण, काही वेळातच शिवाजीराव आढळराव पाटील यांची कारवाई मागे घेण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनातून अनावधानानं बातमी दिल्याची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने पाटील यांच्यावर त्याच्या समर्थकांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. पक्षविरोधी काम […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही आहेत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत…

मुंबई: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलले. यावेळी बोलताना मला निश्चित दुःख झाले आहे असे त्यांनी म्हंटलं आहे. शिवाय एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान सांगितलं. शिवसेनेशी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे वारंवार आम्ही शिवसेनेचे आहोत. आम्ही हे सर्व हिंदुत्वासाठी करतोय असे सांगितले आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे…

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून मार्गदर्शन केलं. मी वर्षावरुन मातोश्रीवर गेलोय. मी मोह सोडलाय. जिद्द सोडलेली नाही, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं काम केले गेलेल्यांना उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावले. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्देः मी जिद्द सोडली नाही, जिद्द अजून […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांच स्मरण करून सांगतो…

मुंबई: बाळासाहेबांच स्मरण करून सांगतो आम्ही हार मानणार नाही, आम्ही जिंकणार, आमची संपूर्ण तयारी झाली आहे, आता तुम्ही मुंबईत याच, असा इशारा संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहे. राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत शरद […]

अधिक वाचा..