shivajirao adhalrao patil

राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार: आढळराव पाटील

मुख्य बातम्या राजकीय

शिरूर (शेरखान शेख): शिवसेनेतून झालेली हकालपट्टी आणि हकालपट्टी मागे घेतल्याच्या प्रकरणाबाबत व आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत लवकरच आपण थेटपणे जाहीर बोलणार आहोत, असे शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनतर शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करत नंतर हकालपट्टीची कारवाई तात्काळ मागे घेतली गेली. तसा फोन थेट मातोश्रीवरुनच आढळराव पाटील यांना आल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. तसेच सदर वृत्त सामनामध्ये अनावधानाने छापल्याचे शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी एका पत्राद्वारे जाहीर केले आहे. मात्र सदर या हकालपट्टी बाबत व हकालपट्टी मागे घेतल्याच्या प्रकरणाबाबत व आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत लवकरच आपण थेटपणे जाहीर बोलणार आहोत, असे शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले.

शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिवसेनेतील हकालपट्टीच्या सामन्यातील बातमीने रविवारी (ता. ३) सकाळपासूनच जिल्ह्यातील राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. याबाबत दुपारी पत्रकार परिषदेत खुलासेवार बोलणार असल्याचे आढळराव पाटील यांनी जाहीर केल्यानंतर त्यांना थेट मातोश्रीवरुन फोन सुरू झाल्याची माहिती आढळराव यांच्या कार्यालयातून देण्यात आली. परंतु हे सर्व चुकून झाले आहे, अशी कारवाई एवढ्या जेष्ठ उपनेत्यावर कशी होवू शकते आणि त्याचे वृत्त सामनात कसे प्रसिध्द होवू शकते यावर उलटसुलट बोलले गेले. परंतु, अशी कारवाई झालेली नसून तसे पत्र शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी जारी करत आढळराव पाटील यांच्या कार्यालया कडेही पाठविण्यात आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमिवर आता आपण स्वत: स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

रात्री उध्दव ठाकरेंचा फोन अन सामनात हकालपट्टीची बातमी…
आढळराव पाटील यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराबाबत बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या कृपेने आपण तीन वेळा खासदार झालो. मात्र, ज्यांच्या विरोधात लढून खासदार झालो त्या राष्ट्रवादीनेच आपला पराभव केला आणि त्याच राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करुन माझ्यासह जिल्ह्यातील शिवसैनिकांना अक्षरश: गेली अडीच वर्षे हैरान केले गेले. हीच वास्तव भूमिका मी बोलत आलो. याच पार्श्वभूमिवर दोन जून रोजी रात्री उशिरा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा स्वत:हून फोन आला होता. पक्षसंघटनेबाबत अनेक विषयांवर ते बराच वेळ त्यांच्याशी चर्चा झाली. मात्र, सकाळी सामनात आलेल्या वृत्तामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली. दरम्यान माझी हकालपट्टीची सामनातील बातमी, त्यानंतर हकालपट्टी मागे घेतल्याचे पत्र आणि एकूणच राज्यातील घडामोडींबद्दल आपण आता काही गोष्टी लवकरच स्पष्टपणे बोलणार असून, आपली पुढील राजकीय भूमिकाही स्पष्ट करणार असल्याचे शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले.