shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुख्य बातम्या राजकीय

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही आहेत

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांनी त्यावर गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असे शिर्षक दिले होते. पण, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकलेला नव्हता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील हे ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. अमोल कोल्हे यांच्या विरोधीत लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून ते शिवसेनेत नाराज होते. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे.

unique international school
unique international school

दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी एकाच वेळी 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना आता सावधतेने पाऊलं उचलताना दिसत आहे.