तळेगाव ढमढेरेतील विद्युत रोहित्राच्या पट्ट्या चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रोड लगत असलेल्या गोविंदधाम येथील विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रोड लगत असलेल्या गोविंदधाम येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने येथील शेतकरी […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेच्या शेतकऱ्याची फसवणूक करणारा औरंगाबादहून जेरबंद

ऊसतोड कामगार पुरवण्याच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ऊस तोड ठेकेदारास ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे म्हणून तब्बल सात लाख यांची फसवणूक करणाऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी औरंगाबाद मधून जेरबंद केले असून स्वप्नील गोविंद गायकवाड असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील संतोष भुजबळ यांचा […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील दोन घरातून दागिने चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील टाकळी भीमा रोड नजीक असलेल्या ढमढेरे वस्ती येथील दोन घरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील टाकळी भीमा रोड नजीक असलेल्या ढमढेरे वस्ती […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या शेतकऱ्यांचा विद्युत वितरणवर मोर्चा

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केल्याने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात असून काही ठिकाणी विद्युत रोहित्रच बंद केले जात असल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढून विद्युत वितरण विभागाचा निषेध नोंदवला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी

स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकलचा सामाजिक उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकल हे नेहमीच वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांच्या वतीने नुकतेच परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी भेट देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयास स्वामी विवेकानंद […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे प्रसाद अनिल रसाळ या युवकाने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे राहणारे प्रसाद रसाळ व त्याचे कुटुंबीय २१ जानेवारी […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे दरवाजाचे कुलूप तोडून ऐवज लंपास

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शिक्षक भवन परिसरात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शिक्षक भवन परिसरात राहणारे संग्राम घुमे हे २० जानेवारी रोजी नातेवाईकांकडे गेलेले […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे नजिक कारच्या धडकेत पत्नी ठार पती जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) नजिक पिंपरी सांडस रस्त्याच्या कडेला पांढरी वस्ती येथे दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात जयश्री शिवाजी गरुड ही महिला ठार तर शिवाजी तुकाराम गरुड हे गंभीर जखमी झाले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील तळेगाव ढमढेरे ते […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात महिलेची फसवणूक

हवेली पंचायत समितीच्या शिक्रापूर पोलिसांत सदस्यावर गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात एका महिलेच्या जमिनीचे खरेदीखत करुन घेऊन महिलेला जमिनीचे पूर्ण पैसे न देताना सदर जमिनीची अन्य व्यक्तींना विक्री करुन महिलेच्या पतीने पैसे मागील्याने महिलेच्या पतीला दमदाटी केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हवेली पंचायत समितीचे सदस्य […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील कार्यक्रमाला छगन भुजबळांची दांडी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे मोठ्या उत्साहात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केलेला असताना आयोजकांकडून प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेले छगन भुजबळ यांनी अखेर या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत दांडी मारल्याचे दिसून आले असून यामध्ये आयोजकांचे अपुरे नियोजन कि आयोजकांचे अपयश असा सवाल उपस्थित केला जात आहे. […]

अधिक वाचा..