तळेगाव ढमढेरेच्या शेतकऱ्याची फसवणूक करणारा औरंगाबादहून जेरबंद

क्राईम शिरूर तालुका

ऊसतोड कामगार पुरवण्याच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ऊस तोड ठेकेदारास ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे म्हणून तब्बल सात लाख यांची फसवणूक करणाऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी औरंगाबाद मधून जेरबंद केले असून स्वप्नील गोविंद गायकवाड असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील संतोष भुजबळ यांचा ऊस तोडणी कामगार घेऊन ऊस कारखान्याला पुरवण्याचा व्यवसाय असून ते ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या ठिकाण हून ऊस तोड कामगार आणत असतात त्यांच्या व्यवसायातून त्यांची स्वप्नील गायकवाड या इसमा सोबत ओळख झाली. त्यानंतर गायकवाड यांनी ऊसतोड कामगारांना ऍडव्हान्स मध्ये पैसे देण्यासाठी काही पैशांची वेळोवेळी मागणी केली असता संतोष भुजबळ यांनी वेळोवेळी स्वप्नील गायकवाड यांना तब्बल सात लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर देखील कामगार येत नसल्याने गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे भुजबळ यांच्या निदर्शनास आले.

याबाबत संतोष विठोबा भुजबळ (वय ४०) रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर)  जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी स्वप्नील गोविंद गायकवाड रा. हरसवाडी ता. कन्नड जि. औरंगाबाद या इसमावार फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले तर गुन्हे दाखल होताच पोलीस नाईक महेंद्र पाटील व उद्धव भालेराव यांनी औरंगाबाद येथे जात स्वप्नील गोविंद गायकवाड यास अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करत आहे.