arun sakore sir

भैरवनाथ विद्याधाम प्रशालेतील शिक्षक अरुण साकोरे सेवानिवृत्त…

शिरूर तालुका

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भैरवनाथ विद्याधाम प्रशाला या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक अरुण साकोरे हे 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले. निरोप समारंभाच्या वेळी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी परिसरातील ग्रामस्थ, नागरिकांची बहुसंख्य उपस्थिती होती.

साकोरे सर हे ग्रामस्थ व संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात, गावच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहत व शाळेतील प्रत्येक कामात दक्ष असत. माजी विद्यार्थी विकास प्रबोधनिच्या प्रत्येक कामात सहभाग घेऊन काम कसे चांगले होईल पाहत होते. त्यांनी शाळेच्या प्रभारी प्राचार्य पदी ही काही दिवस काम पाहिले. अत्यंत लोकप्रिय म्हणून व्यक्तिमत्व लाभलेले साकोरे सर हे विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत होते. सेवाकाळात त्यांनी शाळेला बहुसंख्य बक्षीसे मिळवून दिली आहेत. तसेच जिल्हा पातळी व राज्य पातळीवरील स्पर्धेत सहभागी होऊन शाळेचे नाव उंचावले आहे.

प्रत्येक शिक्षक निवृत्त होतोच पण ग्रामस्थांनी साकोरे सरांना माजी विद्यार्थी विकास प्रबोधनेकडे काम करण्याची विनंती केली. शिक्षण प्रसारक मंडळी सचिव निकम सर यांनी साकोरे सर यांना परत सेवेत रुजू करून घेतल्याचे घोषित केले. हवे तेवढे दिवस प्रशालेत सेवा करण्याची संधी दिली आहे. ह्या निर्णयाचे ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. अत्यंत होतकरू व जमिनीवरती पाय असणारे शिक्षक एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व असून अत्यंत कामसू व कर्तव्यदक्ष असे शिक्षक आहे. त्यांच्या काळात भव्य इमारत उभी राहिली. शाळेत ग्रामस्थांबरोबर विविध उपक्रम राबवून गावाचे व शाळेचे नाव त्यांनी रोशन केले आहे. त्यांनी प्रशालेस 51 हजार रुपये देणगी दिली आहे.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राज्याचे गृह खात्याचे सहसचिव कैलास गायकवाड, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक चोरडिया व फुलपगर, पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब वाळुंज, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसन गायकवाड व प्रकाश वाळुंज, मयूर लोखंडे, रोहिदास वाळुंज, पाबळ चे माजी सरपंच सोपान जाधव, प्राचार्य वेताळ सर, समाजभूषण कैलासराव गायकवाड, वाळुंज नगरचे सरपंच विजय शिनलकर, रानमळ्याचे सरपंच राजू शेठ शिनलकर, खडकवाड्याचे माजी सरपंच अनिल डोके, माजी विद्यार्थी प्रबोधिनीचे सर्व संचालक व संस्थेचे बरेचसे शिक्षक, जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक, संस्थेतील कर्मचारी हजर होते. काही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी साकोरे सरांच्या विषयी अत्यंत हृदय स्पर्शी भाषण केले. शेवटी स्नेह भोजनानी आणि कार्यक्रमाची सांगता झाली.