crime

शिरुर तालुक्यात चोरांनी गरीबाच्या झोपडीतून कशाची चोरी केली पहा…

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर(अरुणकुमार मोटे): मोठमोठया अलिशान घरांमध्ये चोरी, दरोडा टाकल्याचे आपण नेहमी ऐकले असेल पण चोरांनी चोरी करण्याचा कळस केला असून अज्ञात चोरट्यांनी शिरुर तालुक्यातील आण्णापूर येथील कॉलनी फाटयावरील झोपडीतून ऊसतोड कामगारांनी झोपडीत ठेवलेले बाजरीचे दोन कट्टे व उसाचे वाढे विकून जमवलेले 4 हजार रुपये चोरुन नेले आहे.

त्यामुळे शिरुर तालुक्यात या चोरांविषयी तीव्र भावना व्यक्त होत आहे. या उसतोड कामगारांना सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी धीर देत आर्थिक मदत व धान्याची सोय केली आहे. गरीबाच्या झोपडीत चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांना तात्काळ पकडण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

पोलीस सूत्राकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, (दि. २७) डिसेंबर रोजी. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महेंद्र रमेश मोरे (वय २४) व्यवसाय ऊस तोड कामगार (रा.चाळीसगाव, जि. जळगा) सध्या रा. अन्नापूर कॉलनी फाटा, अन्नापूर येथे कोपीवर आले असता कोपीमध्ये आत गेल्यानंतर कोपीतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व लोखंडी पेटीत ठेवलेल्या डब्यामध्ये ऊसाचे वाडे विकून साठून ठेवलेले ४०००/-रुपये व बाजरीचे ५० किलोचे दोन कट्टे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उददेशाने चोरुन नेले असल्याचे निदर्शनास आले.

तशी तक्रार शिरुर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. अज्ञात चोरटया विरुध्द शिरुर पोलीस ठाण्यात भा.द.वी.का.क ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो अंमलदार नाथासाहेब जगताप हे करत आहेत.