निमगाव दुडे- कवठे येमाई रस्त्यावर झाडाझुडपांची गर्दी…

इतर

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील निमगाव दुडे- कवठे येमाई या रस्त्यावर झाडझुडपे मोठया प्रमाणात वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही झाडझुडपे काढून घेतली नाही, तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही तर अपघात होवू शकतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे निमगाव दुडे चे उपसरपंच संदीप वागदरे यांनी सांगितले.

unique international school
unique international school

रस्त्याच्या वळणावरील वाढलेल्या झाडे, झुडपामुळे रस्ता झाकला गेल्याने येणारी-जाणारी वाहने दिसत नाहीत. टाकळी हाजी येथून कवठे येमाई, सविंदणे तसेच भीमाशंकर कारखाना या भागाला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याला मोठी रहदारी असते. तरी हा रस्ता व्यवस्थितपणे खुला व्हावा, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.