पोलीस भरती मध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

इतर

1) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?

उत्तर : शेती

2) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

3) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

4) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?

उत्तर : वित्त सचिव

5) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?

उत्तर : रिझर्व बँकेचे गव्हर्नर

6) ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?

उत्तर : राजीव गांधी

7) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?

उत्तर : 1 मे 1962

8) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?

उत्तर : ग्रामसेवक

9) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?

उत्तर : 7 ते 17

10) जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?

उत्तर : पंचायत समिती

11) जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?

उत्तर : स्थायी समिती

12) गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?

उत्तर : तहसीलदार

13) सातबारा उतारा कोण देतो?

उत्तर : तलाठी

14) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

उत्तर : जिल्हाधिकारी

15) गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?

उत्तर : पोलिस पाटील

16) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?

उत्तर : 34

17) सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?

उत्तर : आठ

18) पृथ्वीला किती उपग्रह आहेत?

उत्तर : एक