Shirur Police Station

शिरुर तालुक्यातील महिलेला चोराचा चेहरा पाहून बसला धक्का; लाखोंचे दागिने हस्तगत…

क्राईम

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चांडोह येथे एका महिलेनं चोरांच्या भीतीनं आपले दागिने किचनमध्ये ठेवले होते. मात्र, डब्यात सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने गायब झाल्याने महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली. पण, शिरूर पोलिसांनी अवघ्या १४ तासांत या चोरीचा छडा लावला. मात्र जेव्हा खरा चोर समोर आला, तेव्हा स्वतःच्या मुलाला पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक करून ९ लाखांहून अधिक किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.

चांडोह येथील दत्तात्रय बबन जाधव यांच्या बंद घराच्या किचनमध्ये स्टीलच्या डब्यात नऊ तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते. २८ एप्रिल रोजी हे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच कुटुंबात खळबळ उडाली. शिरूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपासासाठी तातडीने पथक रवाना केले. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहिती गोळा केली.

पोलिसांना तपासादरम्यान घरातीलच व्यक्तीवर संशय आल्याने त्यांनी रवींद्र दत्तात्रय जाधव (वय ३३) याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या रवींद्रने गुन्ह्याची कबुली दिली. आई-वडील घरी नसताना त्यानेच किचनमधील डब्यातून दागिने लंपास केले होते.

शिरूर पोलिसांनी १४ तासांच्या आत रवींद्रला अटक करून त्याच्याकडून नऊ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि त्यांच्या पथकाचे परिसरात कौतुक होत आहे. मात्र, स्वतःच्या मुलानेच अशा प्रकारे फसवणूक केल्यामुळे जाधव कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी; लाखो रुपयांचे दागिने लंपास…

पत्नीच्या सांगण्यावरून पतीवर हल्ला; शिरूरमध्ये खळबळ

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरूर तालुक्यात अनधिकृत दत्तक प्रकरण उघड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत