पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिरूर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याला तत्परतेने अटक केली होती.
पोलिसांनी या प्रकरणात दत्तात्रय गाडे याच्या विरोधात अवघ्या 52 दिवसात 892 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या संवेदनशील प्रकरणाची न्यायालयात वेगवान सुनावणी सुरू असून, आता या स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याचा गेम ओव्हर झाला आहे.
View this post on Instagram
दत्ता गाडे विरोधात न्यायालयात अखेर अधिकृतपणे आरोप निश्चिती करण्यात आले आहेत. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी बाजू मांडली असून, त्यांनी आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे सादर केले आहेत. सरकारी वकील अजय मिसर यांनी या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी तब्बल 87 साक्षीदार आणि आरोपीच्या गुन्ह्यांची संपूर्ण यादी न्यायालयात सादर केली होती. आरोप निश्चिती झाल्यामुळे आणि इतक्या मोठ्या संख्येने साक्षीदार समोर आल्यामुळे या केसला वेग येऊन पीडितेला लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. गुन्हा घडल्यानंतर फक्त 52 दिवसांच्या आत पोलिसांनी गाडेविरोधात 892 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यात 82 साक्षीदारांकडे तपास करून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदविले आहेत.
दरम्यान, स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये शिरून एका तरुणीवर दोन वेळा बलात्कार केला होता. ही संतापजनक घटना पहाटे 5:45 ते 6:45 च्या दरम्यान घडली होती. गुन्हा केल्यानंतर आरोपी गाडे हा पसार झाला होता आणि आपल्या गावातील शेतात लपून बसला होता. पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढला आणि त्याला शिरूर परिसरातून जेरबंद केलं होतं. त्यानंतर त्याच्यावर खटला चालू आहे.
स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा पाय आणखी खोलात…
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या अडचणीत वाढ…
स्वारगेट बलात्कार प्रकरण! दत्ता गाडे आणि युवतीच्या संबंधाबाबत वकिलांचा दावा…
आरोपी दत्ता गाडे याचा पोलिसाच्या वेशातील फोटो; चौकशीत सत्य समोर येणार…
दत्ता गाडे प्रकरण! एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला?, गुणाट गावकऱ्यांचा मोठा निर्णय…
स्वारगेट बलात्कार प्रकरण! आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने केला मोठा दावा…
दत्ता गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम!; अहो साहेब मी तो नव्हेच…
पोलिस संजू जाधव यांचा आवाज आरोपी दत्ता गाडे याने ओळखताच मोबाईलवर फोन केला अन्….
आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…
आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितलं…
…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड
आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…
शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…
स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…
पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…
शिरूर तालुक्यात घडली धक्कादायक घटना; युवक, युवतीला मारहाण करत केला सामूहिक बलात्कार…