archana-gaikwad-shirur

शिरूर तालुक्यात खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन; महिलेचा मृत्यू…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर : एका विवाहित महिलेने खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना न्हावरे येथे घडली आहे. या घटनेमुळे न्हावरे परिसरासह शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

अर्चना विठ्ठल गायकवाड (वय ३४) असे मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. अर्चना गायकवाड यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अर्चना या आपल्या कुटुंबासह न्हावरे या परिसरात राहत होता. शेती आणि घरकाम सांभाळत कुटुंबाला हातभार लावत असत. अर्चना गायकवाड यांना रविवारी (ता. २८) सकाळी अचानक खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी औषध घेण्याचे ठरवले. त्यानंतर आपल्या घरात खोकल्याचे औषध शोधत असताना कपाटात त्यांनी खोकल्याचे औषधा जागी तणनाशकाची बाटली घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाटलीचा रंग किंवा आकार सारखा असल्याने त्यांची गल्लत झाली असावी आणि त्या बाटलीतील द्रव पदार्थ त्यांनी खोकल्याचे औषध म्हणून घेतले.

अर्चना गायकवाड यांना काही वेळातच त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना कुटुंबियांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी अर्चना यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले. मात्र संपूर्ण शरारीत विष वेगाने पसरल्याने त्यांची प्रकृती खालावली. अखेर उपचारादरम्यान अर्चना गायकवाड यांच्या दुर्देवी मृत्यू झाला.

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

Video! शिरूर तालुका हादरला! चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू; घटनाही अगदी तशीच…

शिरूर! राजस्थान ढाबा पार्किंगमध्ये भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेलेल्या तरुणाचा मृत्यू…

शिरूर तालुक्यातील बापलेकाचा विहिरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू

शिरूरमध्ये विदयुत करंट लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत