गुनाटच्या प्रज्वल भालेरावचा राज्यात डंका, मंथन परीक्षेत राज्यात तिसरा 

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): राज्यस्तरीय मंथन परिक्षेत शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी प्रज्वल संतोष भालेराव याने ३०० पैकी २९४ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असुन त्याला या परिक्षेसाठी त्याच्या वर्गशिक्षिका सुवर्णा नानासाहेब धुमाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रज्वलच्या या यशाबद्दल अहमदनगर येथील नंदनवन लॉन्स या ठिकाणी प्रज्वल भालेराव याचा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या हस्ते गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री डॉ निशिगंधा वाड, शिक्षण आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर, डॉ वैभव आजमोरे, डॉ अक्षयदीप पाटील, डॉ रेखा पाटील प्राध्यापक अशोक जोगदे, वर्गशिक्षिका सुवर्णा धुमाळ, नानासाहेब धुमाळ, राम पवार, वैशाली पवार, नंदाकिनी पवार, ज्योती कोहकडे, संतोष भालेराव, दिपाली भालेराव आदी उपस्थित होते.