शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर समोरून येणाऱ्या टेम्पोला भरधाव वेगाने धडकून एका वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर चाकण रस्त्याने दिपक कावढे हे त्यांच्या ताब्यातील एम एच ४३ वाय २७८२ हा टेम्पो घेऊन जात असताना चाकण बाजूकडून एम एच १४ ई एम ४८६० या छोटा हत्ती वाहनावरील चालक मेघशाम गजबे हा समोरील वाहनांना ओहरटेक करत भरधाव वेगाने आला. यावेळी समोरील टेम्पोला धडक बसून दोन्ही वाहनांचा अपघात झाला.
यावेळी छोटा हत्ती वाहनावरील चालक मेघशाम गजबे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अपघातात छोटा हत्ती वाहनावरील चालक मेघशाम बानाजी गजबे (वय ४३) रा. डोंगरगाव पोस्ट सावली ता. देवरी जि. गोंदिया याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत दिपक बाबाजी कावढे (वय ३५) रा. सोबलेवाडी ता. पारनेर जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मेघशाम बानाजी गजबे (वय ४३) रा. डोंगरगाव पोस्ट सावली ता. देवरी जि. गोंदिया याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.