शिरुर तालुक्यातील त्या सरपंचांना शिवीगाळ करत चालकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या महिला सरपंचांना ग्रामपंचायतच्या वतीने सुरु असलेल्या कामाची पाहणी करुन जात असताना शिवीगाळ, दमदाटी करुन सरपंच महिलेची कार चालवत असलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नवनाथ बबन गायकवाड, निखील नवनाथ गायकवाड, गणेश नामदेव गायकवाड, मनोहर नामदेव गायकवाड, नंदू कृष्णाजी गायकवाड, छाया नवनाथ […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त पत्रकाराला अडवून शिवीगाळ करत दमदाटी

रांजणगाव गणपती: रांजणगाव MIDC त ढोकसांगवी गावच्या हद्दीत न्यानको कंपनी समोर माथाडीच्या बोगस पावत्या बनवुन पैसे वसुल करत असल्याचे फोटो व व्हिडीओ काढल्यामुळे एका पत्रकाराला अडवून शिवीगाळ व दमबाजी करत त्या पत्रकाराच्या मोबाईल मधील व्हिडिओ शूटिंग व फोटो डिलीट करण्याची घटना घडली असुन त्या संबंधित पत्रकाराने याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातून बुलेटची चोरी; गुन्हे दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासह व शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, महीलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवजाची चोरी, खुण, दरोडा या पाठोपाठ दुचाकी चोऱ्यांचे सत्र वारंवार घडत आहे. नुकतीच शिरूर शहरातील रेव्हुन्यू कॉलनीतील उमेश आनंदा इसवे या युवकाची बुलेट मोटारसायकल अज्ञात इसमांनी चोरून नेली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, उमेश आनंदा इसवे (वय […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात घरगुती वादातून महिलेला मारहाण; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेला काठीने करुन जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजीज बाबूलाल इनामदार याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) शबाना इनामदार या महिलेचा पती अजीज इनामदार वारंवार पत्नीला घरगुती वादातून मारहाण करत असे दोन फेब्रुवारी रोजी […]

अधिक वाचा..

मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील बेट भागातील बिबट्यांचे हल्ले वाढले असून मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कासाबाई ठकाजी शिंदे (रा. शिंदेवाडी, मलठण) या थोरातवाडी भागात मेंढ्याचा कळप चारून सायंकाळी तळावर घेवून जात असताना अचानक बिबट्याने हल्ला करून त्यांच्या समोर […]

अधिक वाचा..

शिरुरमधील सराईत सोनसाखळी चोर साताऱ्यातून घेतला ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात (दि ३०) डिसेंबर रोजी ८:४० वाजल्याच्या सुमारास भरदिवसा चैन स्नॅचींगचा प्रकार घडला होता. यातील आरोपीस शिरुर पोलिसांनी जंग जंग पछाडत सातारा येथून मोठया सीताफीने अटक केली असुन त्यास न्यायालयात हजर केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिरुर नवीन नगरपालिका, कोंडे हॉस्पीटल समोरील रोडवर आशा मारुती गरगटे (वय ६७) रा. […]

अधिक वाचा..

सणसवाडीच्या त्या कंपनीतील साहित्य चोरणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल…

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मधून कंपनीच्या दोघा कामगारांनी कंपनीच्या शॉप मधील साहित्याची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रमोद विष्णू कांबळे व भरत बबन वाळूंज या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मध्ये काही कामगार काम करत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ऊसतोड कामगार देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक

जातेगावच्या व्यंकटेशकृपा कारखान्यातील घटना शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स कारखान्याच्या ऊस तोड ठेकेदारास ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे म्हणून तब्बल 5 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किरण नथू पाटील या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

निमोणे येथे ७२ वर्षीय व्यक्तीचा निर्घृनपणे खुन

शिरुर (अरुणकुमार मोटे): निमोणे (ता. शिरुर) येथील मोटेवाडीमध्ये आपल्या मुलीकडे काही दिवसांपुर्वी वास्तव्यास आलेले मनोहर चंदरराव शितोळे रा. सांगवी सांडस, ता. हवेली, जि. पुणे यांचा निमोणे- मोटेवाडी रोडलगत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचा निर्घृनपणे खुन केला आहे. त्याबाबत त्यांचा मुलगा राजाराम मनोहर शितोळे रा. सांगवी […]

अधिक वाचा..

सणसवाडीच्या मंदिरातून चांदीच्या पादुका व त्रिशुल चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला असलेल्या भैरवनाथ मंदिरातील देवाच्या चांदीच्या पादुका व त्रिशुल चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मंदिराचे पुजारी बाळासाहेब गाडे हे सकाळच्या सुमारास मंदिरात नित्यपूजा करण्यासाठी आले असता त्यांना मंदिरातील […]

अधिक वाचा..