शिरुरला पुन्हा प्रभारी तहसिलदाराची नियुक्ती; आमदार पवार उपोषण करणार का?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर ला पुन्हा पुर्णवेळ तहसिलदार न देता प्रभारी तहसिलदार दिल्याने शिरूर तालुक्यामधील नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे आमदार आता ३० जानेवारीपासून याबाबत उपोषण करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. शिरूर तहसिल कार्यालयात गेले अनेक दिवसांपासून प्रभारी तहसिलदार प्रशांत पिसाळ यांच्याकडे पदभार सोपावला होता. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीचा मुळ चार्ज असल्यामुळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दरोडा सदृश घटनेने खळबळ

बाजारपेठेतील सोनार दांपत्याला दुकानात मारहान शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील मुख्य बाजारपेठेतील एका सोनाराच्या दुकानात दाम्पत्य दुकान बंद असताना रात्री आठच्या सुमारास अचानक एका युवकाने दुकानात घुसून दांपत्याला हत्यार सारख्या वास्तूने मारहाण केल्याने खळबळ उडाली असून दरोडा सदृश घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील महेंद्र शहा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते प्रकाशन 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मलठण (ता. शिरुर) येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाचे विभागीय सदस्य अरुणकुमार मोटे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख देवकीनंदन शेटे, शिरुर तालुकाध्यक्ष प्रमोल कुसेकर, कार्याध्यक्ष तेजस फडके, सचिव सागर रोकडे, संपर्कप्रमुख शकील मनियार, […]

अधिक वाचा..

अज्ञात व्यक्तीने पळवून नेला अशी फिर्याद असलेला मुलगा सुखरुप घरी परतला…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील बाबुरावनगरमधील प्रज्वल गिरे या 8 वर्षीय मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमिष दाखवून त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेत पळवून नेल्याची फिर्याद त्याची आई प्रिती विनोद गिरे यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. वडिलांकडे जातो, असे सांगून तो घराबाहेर गेला होता. आई रागावल्याने आईवर रुसुन तो पायी पायी पुणे -नगर रोडवडील बोऱ्हाडे मळा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अज्ञात कारणातून परप्रांतियाचा खून

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) वढू बुद्रुक रोड लगत अज्ञात कारणातून सुशांत अनिल करकरमर या परप्रांतिय इसमाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील वढू रोड लगत खराडे बिल्डींग मध्ये रफिक पठाण यांच्या खोलीत राहणारा सुशांत […]

अधिक वाचा..

शिरूरला तहसिलदार दया, नाहीतर बेमुदत उपोषण आमदार अशोक पवार आक्रमक 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात कायमस्वरुपी तहसिलदार नसल्याने नागरीक वर्षभर वारंवार हेलपाटे घालून त्रस्त झाले आहेत. शिरुर तहसिल कार्यालयात गेल्या वर्षाहून अधिक काळ प्रभारी तहसिलदार असल्याने नागरीकांची अनेक कामे खोळांबली आहे. प्रभारी तहसिलदारांना दुसरीकडचा चार्ज असल्याने शिरुरकडे पुरेसा वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन तहसिलदार आणण्याबाबत राजकिय पदाधिकारी यांना वेळ नाही का…? नागरीक […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी स्वाती पाचुंदकर यांची बिनविरोध निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी महत्वाचं देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी स्वाती दत्तात्रय पाचुंदकर यांची बिनविरोध निवड झाली असुन रांजणगाव गणपती देवस्थानच्या इतिहासात सन 1941 नंतर प्रथमच स्वाती पाचुंदकर यांची महिला अध्यक्ष म्हणुन पहिल्यांदाच निवड झाली असुन देवस्थानच्या इतर चार सहकाऱ्यांनी पुढील पाच वर्षांसाठी स्वाती पाचुंदकर यांनाच बिनविरोध अध्यक्ष […]

अधिक वाचा..

“शिरुर तालुका मल्ल सम्राट” स्पर्धेच्या लोगोचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते अनावरण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील अविनाश संकपाळ व आशिष देशमुख या दोन्ही तरुणांचा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा” तसेच प्रकारच्या कुस्ती स्पर्धा प्रत्येक तालुक्यात व्हाव्यात. त्यामुळे तळागाळातील मल्लांना चांगली संधी प्राप्त होईल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. आज (दि 20) रोजी पुणे येथे केंद्रीय सूक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या […]

अधिक वाचा..

पिंपरखेड येथे जबरी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील पिंपरखेड (पंचतळे) येथे संतोष कारभारी जाधव यांच्या घरावर मध्यरात्री तीनच्या सुमारास जबरी चोरी करत सुमारे आठ तोळे सोने, मोबाईल, टायटन कंपनीचे घड्याळ व पंधरा हजार रूपये रक्कम असा अंदाजे एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून चोरट्यांनी पोबारा केला. याबाबत रेश्मा संतोष जाधव यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे […]

अधिक वाचा..

नागरिकांच्या सतर्कतेने शिक्रापुरात फिरणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास बेड्या…

तोतयाकडे महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे देखील ओळखपत्र शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करुन फिरणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून चंद्रमणी शशिकांत शेवाळे, असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरातील वाजे […]

अधिक वाचा..