रामलिंग येथे शाळापुर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे): बालवाडीतुन इयत्ता पहिली मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून, खेळातून त्यांना शिक्षणाची गोडी लागावी. यासाठी शिक्षकांनी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. या छोट्या मुलांना त्यांच्या कलाने शिकवले तर त्यांना शिक्षणात गोडी निर्माण होईल आणि सर्व मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील असे मनोगत शिरुर ग्रामीणचे उपसरपंच यशवंत कर्डिले यांनी व्यक्त केले.

शासनाच्या परीपत्रकानुसार रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामलिंग येथे शाळापुर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन करुन करण्यात आली. यावेळी यानंतर इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र असणाऱ्या मुलांना ओवळण्यात आले आणि त्यांना गुलाब फुले, चॉकलेट देऊन त्यांचे अनोखे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी, फुगे, सजावट केलेली पाहून छोट्या मुलांना खूप आनंद झाला.

या मुलांची बौद्धिक क्षमता पाहण्यासाठी समुपदेशन, शारीरिक विकास, बौद्धिक विकास सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास, गननपूर्व तयारी पाहण्यासाठी काही उपक्रम घेण्यात आले. त्याला या सर्व मुलांनी छान प्रतिसाद दिला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माऊली रेपाळे, उपसरपंच – यशवंत कर्डिले, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ राणी कर्डिले, सदस्य संदीप देव्हाडे, पालक राधा रेपाळे, पुजा कुरुंदळे, पूनम चव्हाण, सविता शेवाळे, शिक्षक उर्मिला जगदाळे, उज्वला लाळगे, सुनंदा हिंगे, मनीषा सालकर, निता वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका नंदिनी शिर्के यांनी तर आभार गणेश रासकर यांनी मानले.