‘रांजणगाव मॅरेथॉन’ साठी उरले फक्त पाचच दिवस अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या हस्ते उदघाट्न 

शिरुर (तेजस फडके) आर एम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता ‘रांजणगाव मॅरेथॉन’ 2022 या स्पर्धेचे आयोजन रांजणगाव गणपती येथे होत असून या स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन सिनेअभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत २ लाखांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ‘महागणपती फाउंडेशन’ यांचेही सहकार्य राहणार आहे. […]

अधिक वाचा..

लाचखोरपणामुळे शिरुरच्या महसुलची अब्रु चव्हाट्यावर, पैसे दिल्याशिवाय नागरीकांची कामेच होत नाहीत…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील महसुल विभागाच्या तत्कालीन तहसीलदार, तलाठी, महसुल सहाय्यक व दोन खाजगी इसमांना तब्बल ४२ लाखांची लाच मागताना लाललुचपत विभागाने गुन्हा दाखल केल्याने पुणे जिल्हयासह महाराष्ट्रभर या मोठया लाचेच्या प्रकरणाची चर्चा चांगलीच गाजली. एवढया मोठया ४२ लाखाच्या रकमेच्या लाचेची ही पुणे जिल्हयातील बहुदा पहीलीच कारवाई असावी. महसुल विभागासह इतर विभागात नागरीकांची, शेतकऱ्यांची […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांनी खुन झालेल्या मयताची ओळख पटवत 12 तासाच्या आत आरोपीना ठोकल्या बेड्या

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील एक्सप्रो इंडीया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच डंकन कंपनीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुला असलेल्या मोकळ्या माळरानामध्ये एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी पुरुषाचा डोक्यात दगड घालून खुन करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुरुवार (दि.01) रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..

‘रांजणगाव मॅरेथॉन’ च्या बुकिंगसाठी उरले फक्त आठ दिवस

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ‘रांजणगाव मॅरेथॉन’ ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच या स्पर्धेत दरवर्षी हजारो स्पर्धक सहभागी होऊन आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश देतात. यावर्षीही या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आता फक्त आठ दिवसांची मुदत राहिली असुन जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले […]

अधिक वाचा..

मानव विकास परिषदेच्या वतीने रांजणगाव मध्ये संविधान दिनानिमित्त MPSC च्या विद्यार्थ्यांचा सत्कार

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे संविधान दिनाचे औचित्य साधुन मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिरुर तालुक्यातील MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 11 विद्यार्थ्यांची विक्रीकर निरीक्षक तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मानव […]

अधिक वाचा..

त्या युवा उदयोजकांनी स्वयंरोजगाराचे धडे गिरवत शेती औजारे बनविण्यातून घेतली उभारी

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील विकास किठे, गोविंद किठे या दोन तरुण बंधुनी वेल्डिंग व्यवसायात स्वयंरोजगाराचे धडे गिरवत नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वताचा अर्थपुर्ण हिशोब करत ते चांगला रोजगार मिळवत आहेत. या व्यवसायात नेत्रदिपक भरारी घेत शेती उपयोगी औजारे बनवून या व्यवसायात त्यांनी मोठा हातखंडा निर्माण केला आहे. या मध्ये ट्रक्टरची ट्रॉली, नांगर, […]

अधिक वाचा..

‘त्यांचा कचरा जळतोय पण साहेब इथं आमचा जीव जळतोय’ रांजणगावमध्ये सर्वसामान्य लोकांचे आरोग्य धोक्यात

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील स्थानिक तसेच बाहेरचे भंगार व्यावसायिक यांनी औद्योगिक वसाहतीतुन आणलेला धोकादायक कचरा कोणत्याही स्वरुपाची प्रक्रिया न करता रात्रीच्या वेळेस जाळून टाकण्याचा सपाटाच लावला असुन त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना याचा विनाकारण त्रास होत आहे. तसेच धुरामुळे आसपासच्या परीसरातील झाडे, पशुपक्षी तसेच मानवी जीवनावर याचा […]

अधिक वाचा..

आज बेलवंडी फाटा इथं आमदार निलेश लंके यांच्या हस्ते भाजीपाला मार्केटचे उदघाटन

शिरुर (तेजस फडके) शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तरकारी खरेदी विक्री पहाटे चार वाजता करण्याच्या प्रशासनाच्या आठमुठ्या धोरणामुळे वेठीस धरल्या गेलेल्या पारनेर व श्रीगोंदा तसेच शिरुर तालुक्यातील तरकारी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार निलेश लंके हे धावून आले असुन या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आज शुक्रवार (दि 25) रोजी दुपारी पाच वाजता बेलवंडी फाटा येथे स्वतंत्र तरकारी […]

अधिक वाचा..

‘रांजणगाव मॅरेथॉन’ ही तर शिरुर तालुक्यातील आरोग्यप्रेमींसाठी मेजवानी: शोभाताई धारीवाल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात अनेक खेळाडूंच भवितव्य घडत असुन आरोग्य प्रेमींसाठी ‘रांजणगाव मॅरेथॉन’ ने शिरुर तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच या स्पर्धेत दरवर्षी हजारो स्पर्धक सहभागी होऊन आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश देतात. यावर्षीही या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून कोरोनानंतर आरोग्यप्रेमी शिरुरकरांना मेजवानीचा एक वेगळा अनुभव मिळेल, असा विश्वास प्रसिद्ध उद्योजिका […]

अधिक वाचा..

केंद्रातील योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात:- प्रल्हादसिंह पटेल

शिक्रापुर (शेरखान शेख) केंद्र सरकारच्या नागरिकांसाठी असंख्य योजना असून केंद्रातील योजना भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले आहे. शिक्रापुर (ता. शिरुर) येथे शिरुर लोकसभा प्रवास योजना दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय जलशक्ती मंत्री प्रल्हादसिंह पटेल बोलत होते.   यावेळी […]

अधिक वाचा..