ZP निवडणुक; कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटातील अत्यंत महत्त्वाचे आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्या जयश्री कोहकडे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल (दि १७) रोजी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. कारेगाव ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच व उपसरपंच, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार […]

अधिक वाचा..

‘रन फॉर हर’ निमित्त शिरूरमध्ये परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंह यादव यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

शिरूर (नितीन थोरात): “Run For Her” या उपक्रमाच्या निमित्ताने शिरूर येथील गंगा एज्युकेशन सोसायटी व Healing Lives या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कारगिल युद्धातील शौर्यगाथा अनुभवलेल्या, वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी परमवीर चक्राने सन्मानित झालेले कारगिलवीर योगेंद्रसिंह यादव यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. गंगा एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात योगेंद्रसिंह यादव यांनी बालपणापासून […]

अधिक वाचा..

रांजणगावात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त, २०३ किलो ‘बंटा’ गोळ्यांसह तरुण ताब्यात

कारेगाव (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी परिसरात गांजा मिश्रित गुंगीकारक ‘बंटा’ नावाच्या तब्बल २०३ किलो ६०० ग्रॅम गोळ्या बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या एका तरुणास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ५७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पुणे ग्रामीण जिल्ह्यात अमली व तंबाखुजन्य पदार्थांच्या […]

अधिक वाचा..

कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तेचा ‘सावळा गोंधळ’ सरपंच पदाचा वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिघळला

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील ‘सरपंच’ पदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ठरलेल्या वेळेत राजीनामा न दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांसह थेट ग्रामस्थांनाच बैठक बोलावण्याची नामुष्की ओढवली आहे. सरपंच-उपसरपंच पद कोणाला द्यायचे, किती कालावधीसाठी द्यायचे, राजीनामा घ्यायचा की नाही—या सर्व प्रश्नांची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात आहेत, हा प्रश्न आता कारेगावकरांना पडला आहे. देवाच्या शपथा…पण त्या पाळल्याचं […]

अधिक वाचा..
cash

शिरूर! पंचनाम्याच्या बदल्यात ‘दर ठरवला’; लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

शिरूर (तेजस फडके) : जमिनीचा पंचनामा तक्रारदाराच्या बाजूने करुन देण्यासाठी आधी १० हजारांची मागणी केली. अखेर ७ हजारांवर सौदा झाल्यानंतर न्हावरे चौकात एसीबीच्या सापळ्यात अडकल्या. ग्राम महसूल अधिकारी प्रमीला नागेश वानखेडे यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लाच लुचपत विभागाचे (एसीबी) पुण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय उलथापालथ; राजकीय गणितांना मोठा धक्का…

उपनगराध्यक्षपदी मितेश गादिया; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधी बाकावर शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित उलथापालथ पाहायला मिळाली आहे. निवडणुकीदरम्यान परस्परांविरोधात उभे ठाकलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अखेर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले. या अनपेक्षित युतीमुळे भाजपच्या राजकीय गणितांना मोठा धक्का बसला असून भाजपला विरोधी बाकावर […]

अधिक वाचा..
trupti-sarode

शिरुर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटात ‘शांतता’; तृप्ती सरोदे मैदानात तर बाकी उमेदवार…

शिरुर (तेजस फडके) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असताना शिरुर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटात मात्र चित्र वेगळेच दिसत आहे. राजकीय रणधुमाळी सुरू असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या तृप्ती अजय सरोदे यांच्या व्यतिरिक्त कोणताही इच्छुक उमेदवार उघडपणे मैदानात उतरलेला दिसत नाही. त्यामुळे या […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक! टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचा ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय आढावा

शिरूर (नितीन थोरात): जिल्हा परिषद निवडणूक 2026 च्या टाकळी हाजी या गटामध्ये पंचायत समितीचे दोन गण समाविष्ट आहेत. या जिल्हा परिषद गटात सन 1962 मध्ये सत्ता विकेंद्रीत करण्याचा आणि त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या स्थापन झाल्या तेव्हापासून टाकळी हाजी गावचे माजी आमदार श्री. पोपटरावजी गावडे साहेब यांना सातत्याने नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांच्या बरोबरीने […]

अधिक वाचा..
mandavgan-voting

वाघोलीला मतदानासाठी आलात तर रडस्तोर मारून पोलिसांच्या हवाली केले जाईल…

शिरुरच्या पुर्व भागात वाघोली मतदार यादीतील दुबार नावांवरुन फ्लेक्सबाजी… शिरूर (तेजस फडके) : पुणे महानगरपालिका हद्दीतील वाघोली येथील मतदार यादीत शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आढळून आल्याने निवडणुक व्यवस्थेतील गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभुमीवर मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, वडगाव रासाई, इनामगाव, निर्वी, बाभुळसर बुद्रुक, पिंपळसुटी, तांदळी आदी गावांमध्ये मध्यरात्री […]

अधिक वाचा..

ZP निवडणुक; कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद गावातील ग्रामस्थ पाणीप्रश्नावर आक्रमक…? 

शिरुर (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद या गावांची पाणी प्रश्न सोडविण्याची गॅरंटी कोणता नेता घेणार…? असा सवाल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. प्रत्येक निवडणुकीत तालुक्यातील बारा गावांचा पाणी प्रश्न, या प्रश्नावर परस्पर नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. लोकप्रतिनिधींकडून पाणी प्रश्न तडीस नेण्याच्या वल्गना केल्या आहेत. […]

अधिक वाचा..