अजितदादांसोबत आले तेच खरे कुटुंब; आनंद परांजपे यांची ठाम भूमिका

ठाणे: “कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नसतात. २ जुलै २०२३ रोजी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर जे सर्व अजितदादांसोबत आले, तेच त्यांचे खरे कुटुंब होते,” अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मांडली. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्या कुटुंबावर किती वेदना होत असतील, याचा क्षणभर विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. ठाणे […]

अधिक वाचा..

तंत्रज्ञान-उद्योग सहकार्याला नवी गती; महाराष्ट्र-वाकायामा संबंध अधिक दृढ होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र आणि जपानमधील वाकायामा प्रांत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील हॉटेल ताजमहल पॅलेस येथे वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागा’च्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल’चे रूपांतर आता ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग’ असे करण्यात आले आहे. या नव्या विभागाच्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या […]

अधिक वाचा..

अवैध नागरिकांना दिलेली २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रे महिन्याभरात ताब्यात घ्या; महापौर रितू तावडे

मुंबई: मुंबईत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिलेली २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रे एक महिन्याच्या आत ताब्यात घेण्याचे आदेश रितू तावडे यांनी दिले. तसेच शहरातील फेरीवाल्यांच्या जन्मप्रमाणपत्रांसह इतर कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर संजय घाडी, भाजपचे […]

अधिक वाचा..

मंत्रालयात लाचखोरी प्रकरण: मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित मंत्री कार्यालय सील केले आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री झिरवळ यांच्या तात्काळ […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यासाठी SDG २०३० अंतर्गत स्वतंत्र निर्देशक आराखड्याची मागणी; ३% निधी खर्चाचे सादरीकरण करा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व सर्व आमदारांची विशेष बैठक घ्यावी, दलितवस्ती निधी आणि SIR मोहिमेवरही प्रश्न पुणे: पुणे विभागीय कार्यालयात आज जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शाश्वत विकास ध्येये (SDG २०३०) प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र जिल्हा […]

अधिक वाचा..

ग्रंथालय संचालनालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ वितरणास सुरुवात

मुंबई: ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खरेदी करण्यात आलेल्या सन 2023 मधील ग्रंथांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधीच्या “ग्रंथभेट” योजनेअंतर्गत सन 2024-25 या […]

अधिक वाचा..

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेना (उबाठा)ला पाठिंबा देऊन आघाडी धर्म पाळला

चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही मुंबई: चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा)चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी […]

अधिक वाचा..

संभाजीनगरात अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला; दामिनी पथकाची तात्काळ कारवाई, मुलीला मिळाले नवजीवन

छत्रपती संभाजीनगर : “काही बोलावं, कसं सांगावं?” असा प्रश्न निर्माण करणारी घटना आज बीड बायपास रोड परिसरात उघडकीस आली. एका १७ वर्ष ६ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असताना पोलिसांनी वेळीच धाड टाकून हा बालविवाह रोखला. दामिनी पथक आणि महिला व बालविकास समितीच्या तत्परतेमुळे एका मुलीचं आयुष्य अंधारातून वाचलं आहे. नेमकं प्रकरण काय? बीड बायपास […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या शैलीतच सुनेत्रा पवारांचा अधिकाऱ्यांना इशारा; गुणवत्तेशी तडजोड सहन केली जाणार नाही

पुणे : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदासह पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. गुरुवारी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री म्हणून त्यांनी प्रथमच उपस्थिती लावली. या बैठकीत त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचीच झलक दाखवत अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि ठोस सूचना दिल्या. बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांची सद्यस्थिती, […]

अधिक वाचा..