अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू…

अटल सम्मान पुरस्काराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्मानित  मुंबई: सर्व देशांनी घातलेल्या बहिष्काराची पर्वा नं करता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्ये अणुचाचणी घेऊन जगाला भारताची ताकद दाखवली. त्यांनी भारत देशाला आत्मनिर्भर बनविले. अटलजींच्या मार्गांवर चालून देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू या, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बांद्रा येथील हॉटेल रंगशारदामध्ये दीप कमल फाउंडेशनतर्फे […]

अधिक वाचा..

मी कोणतही वादग्रस्त विधान केल नाही, ‘स्वराज्यरक्षक’ या भूमीकेवर मी ठाम…

मुंबई: ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून माझ्या विरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा घणाघात विधानसभेचे […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीसाठीची अशी असेल लेखी परीक्षा

पोलीस भरतीसाठी 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रच विक्रीस काढला आहे का?

मुंबई: महावितरण कंपनीवर खाजगी कंपन्यांचा डोळा असून या कंपनीचे खाजगीकरण होऊ नये म्हणूनच राज्यातील वीज कंपन्यांचे कर्मचारी संपावर गेले आहेत. महावितरण ही महत्वाची तसेच फायद्यात असलेली कंपनी अदानीसारख्या खाजगी उद्योगपतीच्या घशात घालण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव आहे. महावितरणचे खाजगीकरण सुलभ व्हावे यासाठीच अंबानी-अदानीच्या मुलांची राज्याच्या आर्थिक सल्लागार मंडळावर निवड केल्याचे दिसत असून शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रच विक्रीस […]

अधिक वाचा..

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरिबांना अतिरिक्त ५ किलो अन्नधान्य पुरवणारी प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना मोदी सरकारने बंद केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ८१ कोटी गरिबांना महिन्याला १० किलो धान्य मिळत होते परंतु आता फक्त ५ किलोच मिळणार आहे. मोदी सरकारने […]

अधिक वाचा..

भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे फक्त धुळफेक: महेश तपासे

मुंबई: ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहित नाही… अजित पवार काय म्हणाले हे माहीत नाही… आपण कशासाठी आंदोलन करत आहोत हे माहीत नाही त्यावरून भाजपचे आंदोलन म्हणजे फक्त धुळफेक आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्य रक्षक’ म्हणून संबोधल्यानंतर […]

अधिक वाचा..

विनापरवानगी फोटो, शूटिंग करणाऱ्यांना होणार २ हजारांचा दंड..

औरंगाबाद: डाॅ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेसंदर्भात सात सदस्सीय बैठक पार पडली. यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात असून ते खालीलप्रमाणे आहेत… प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी फोटो, व्हिडीओ शूटिंग केल्यास २ हजार रु. दंड विद्यापीठ परिसरात वाहन शिकवण्यासाठी दुचाकी, चारचाकी आढळून आल्यास ३ हजार रुपये दंड आकारला जाणार. प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनास पूर्वपरवानगी लागेल. उपोषण, मोर्चे आंदोलनाला पोलिसांची […]

अधिक वाचा..

वीज कर्मचारी संपावर; राज्यभर तीन दिवस आंदोलन…

औरंगाबाद: महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. राज्य सरकार आणि महावितरण कंपनीच्या उच्चपदस्थांनी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी मंगळवारी चर्चा करूनही संघटना संपावर ठाम राहिल्याने तीन दिवस राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रातील काही […]

अधिक वाचा..

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांच्या निधन

संभाजीनगर: मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. शेतकरी कष्टकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी आग्रही भूमिका घेणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यांनी व्यक्त करत भाई यांना श्रद्धांजली वाहिली. या दुःखद […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते…

मुंबई: गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला मान्य आहे की नाही हे भाजपने पहिल्यांदा सांगावे आणि मान्य नसेल तर गोळवलकरांचे पुस्तक भाजपची अध्यात्मिक आघाडी जाळणार का हेदेखील सांगावे असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे. विरोधी पक्षनेते अजित […]

अधिक वाचा..