महापौर-उपमहापौर निवडणुकीत तिरंगी लढत; राष्ट्रवादीच्या ऐनवेळच्या उमेदवारीने ‘ट्विस्ट’

पुणे: महापालिका निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपकडून मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्याचवेळी कॉंग्रेस पक्षानेही विरोधी भूमिका कायम ठेवत दोन्ही पदांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महापौर-उपमहापौर निवडणुकीत मोठा राजकीय ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या […]

अधिक वाचा..

जुन्नर तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष पांडुरंग पवार यांचे पक्ष सदस्यत्व रद्द

जुन्नर: जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष पांडुरंग पवार यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना ही कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पक्ष सध्या शोकाकुल अवस्थेत असताना, पांडुरंग पवार […]

अधिक वाचा..
trupti-sarode

शिरूर तालुक्यातील नागरिकांचा तृप्ती सरोदे यांच्यावरचा विश्वास उडाला; कारण…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात अजित दादांच्या राष्ट्रवादी कडून तृप्ती सरोदे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होत्या. परंतु, पक्षाने ऐन वेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हातात घेतला. परंतु त्यानंतर काही दिवसातच त्यांनी शिवसेनेकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेत सगळ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला. काही करून निवडणूक लढविणारच, […]

अधिक वाचा..

अमरावती महापालिकेत भाजपचा डावपेच! राष्ट्रवादीला सोबत घेऊन राणा दाम्पत्याला थेट संदेश

अमरावती: महापालिकेच्या सत्ताकारणात भाजपने संख्याबळ जुळवताना युवा स्वाभिमानला सोबत घेतले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)लाही युतीत सहभागी करून घेत राजकीय चेकमेट खेळी खेळली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसोबत राहून विरोधात काम केल्याने निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी ‘महापौर भाजपचाच’ असा प्रचार निवडणुकीनंतर राबविणाऱ्या युवा स्वाभिमानला भाजपने त्यांच्या शैलीतच उत्तर दिले आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत […]

अधिक वाचा..

३० आमदारांची सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमण्याची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावरून सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. पक्षातील तब्बल ३० आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी विनंती करणारे पत्र पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे. अजितदादा पवार यांच्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना वेग; शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द अन्…

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय हालचालींना वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांकडून विलीनीकरणाबाबत सूचक वक्तव्ये केली जात आहेत. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनाचा निवडणुकांवर परिणाम? सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात प्रवेश करणार

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पवार कुटुंबीय दुःखातून सावरत हळूहळू राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..
jyoti-pachundkar

रांजणगाव-कारेगाव मूळ गटाचा कायापालट करणार : ज्योती मानसिंग पाचुंदकर

कान्हूर मेसाई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाच्या संकल्पनेला अभिप्रेत असलेला रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट नागरिकांची समस्या सोडवून प्रगतीपथावर आणून त्याचा कायापालट करणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी दिले आहे. View this post on Instagram रांजणगाव कारेगाव मुळ जिल्हा परिषद गटात अंतर्गत रस्ते, सांडपाणी, […]

अधिक वाचा..

भाजपशिवाय राष्ट्रवादीचे विलीनीकरण अशक्य; अजितदादांनंतर नेतृत्वावरही भुजबळांचे मोठे संकेत

नाशिक: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी जनसागर उसळला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भवितव्याबाबत आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे.या चर्चांवर ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना अत्यंत स्पष्ट आणि […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी बंधनकारक; उद्योग व खासगी आस्थापनांना शासनाचे आदेश

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले […]

अधिक वाचा..