Shirur Police Station

अपमानित करणारी पोस्ट टाकल्याच जाब विचारल्याने सरपंच महिलेसह नातेवाईकांना मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे) इनामगाव (ता. शिरुर) येथील ऊपसरंपच सिध्देश्वर शिवाजी नांद्रे याने व्हाट्सअप ला अपमानित करणारी पोस्ट टाकल्याने त्याबाबत सरपंच महिला हिने विचारणा केल्याने तिला शिवीगाळ धक्काबुक्की केली. हे भांडण सोडवायला आलेल्या तिच्या पतीला, वडीलांना, दीराला तसेच भावाला लाथाबुक्यांनी व काठीने नांद्रे व त्याच्या सोबत असणाऱ्या इसमांनी मारहाण केली असून ग्रामपंचायतीच्या कपाटाचे, खिडकी दरवाजे फोडून […]

अधिक वाचा..

सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी सत्काराला फाटा देत विशेष मुलांच्या संस्थेला मदत

शिरूर (अरुणकुमार मोटे): तब्बल ३५ वर्षे शासकीय सेवा बजावल्यानंतर शिरूर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त होताना सामाजिक भान ठेवून सत्काराला फाटा विशेष मुलांच्या संस्थेला मदत करण्यात आली आहे. शिरूर पंचायत समिती येथे कृषी विस्तार अधिकारी म्हणून संभाजी बाबुराव कोळपे हे नियुक्तीस होते. शिरूर पंचायत समिती येथे नियुक्तीस असताना अनेकांच्या समस्या सोडवण्यास त्यांनी प्राधान्य दिले.शिरूर तालुक्यात […]

अधिक वाचा..

वटपौर्णिमेनिमित वडाचे झाड लाऊन दिला आगळावेगळा संदेश

शिरुर (किरण पिंगळे): वटपौर्णिमा सणाला अनेक महिला वडाच्या झाडाची फांदी आणुन त्याची पुजा करतात. परंतु शिरुर तालुक्यातील स्मिता हरी इसवे या नवविवाहित युवतीने वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची फांदी न तोडता वडाच्या झाडाचे वृक्ष रोपण करुन समाजातील सर्व महिलांना सामाजिक झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश दिला आहे. शिरुर येथील स्मिता इसवे हि युवती पोलिस मित्र […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथे वादळी वाऱ्याने दुध डेअरी वरचे पत्रे उडून गेल्याने नुकसान

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात वादळी वाऱ्यामुळे पांडुरंग कृपा या दुध डेअरीचे पत्रे उडून गेल्याने अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती डेअरीचे मालक शिवाजी वाळुंज यांनी दिली. तसेच दुध डेअरीच्या जवळच असलेल्या विजेच्या खांबावरील तारा तुटून रस्त्यावर पडल्याने विजप्रवाह खंडित झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवार (दि 4) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; चौदा वर्षीय मुलगी गरोदर 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सध्या दिवसेंदिवस वेगवेगळ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असुन गुन्हेगारांना कायद्याचा बिलकुल धाक राहिलेला नाही. शिरुर शहरात सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शिरुर तालुक्यात चौदा वर्षीय मुलीवर वारंवार झालेल्या अत्याचाराने मुलगी गरोदर राहिल्याची घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात रतीलाल चून्या कुवर याचे विरुद्ध बलात्कार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अतिरिक्त भारनियमनाने बळीराजा संकटात पिकांची होरपळ 

शिरुर (तेजस फडके): सध्या उन्हाच्या झळांनी सर्वच पिकांची अवस्था केविलवाणी झालेली असुन विजेच्या अतिरिक्त भारनियमनाचाही फटका या पिकांना बसत आहे. पाणी असूनही भारनियमनामुळे पिकांची तहान भागवणे अवघड झाले असून, शेतातील पिकांची होरपळ होण्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी करत आहेत. शिरसगाव काटा, आलेगाव पागा, मांडवगण फराटा, न्हावरे येथील वीज उपकेंद्रांना शिरूर […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये खासदार संजय राऊत यांचा जोडे मारो आंदोलन करत निषेध 

शिरुर (तेजस फडके): खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार शिरसाट यांच्या विषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर खासदार संजय राऊत थुंकल्याच्या निषेधार्थ शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. संजय राऊत यांनी केलेली कृती अयोग्य असल्याचेही शिवसैनिकांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात तीन दिवसांपासुन विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील शेणाचा मळा येथील एका विहिरीत तीन दिवसांपुर्वी पडलेल्या कुत्र्याला सर्पमित्र गणेश टिळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व सुरक्षित उपकरणांच्या साह्याने विहिरीमध्ये उतरत कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढून जीवदान दिले आहे. येथील शेतकरी मंगेश नरके हे विहिरीवर असलेला विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतून एका प्राण्याचा ओरडण्याचा आवाज […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील दत्तात्रय खंडू जाधव (वय 49) हे रांजणगाव गणपती येथील बसस्थानकाकडुन मंदिराकडे पायी चालत येत असताना त्यांना पाठीमागून टेम्पोने धडक दिली होती. त्यानंतर त्यांना शिरुर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. रांजणगाव गणपती येथील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात दत्तात्रय जाधव यांचे मोलाचे योगदान […]

अधिक वाचा..