रांजणगाव MIDC तील DSM कंपनीकडून श्री गणेशा हॉस्पिटलला रुग्णवाहिका सुपूर्त

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) कोरोनाच्या काळात श्रीगणेशा हॉस्पिटलने रुग्णसेवेचे केलेलं कार्य निश्चितच कौतुकास्पद असुन कोरोना काळात आपल्या सर्वांना ऑक्सिजनची किंमत कळाली आहे. कोरोना मध्ये श्री गणेशा हॉस्पिटलने केलेली रुग्णसेवा विसरता येणार नाही असे प्रतिपादन वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी केले.

शिरुर येथे वनराई संस्था आणि रांजणगाव MIDC तील DSM वतीने श्री गणेशा हॉस्पिटलला अद्ययावत कार्डीयाक रुग्णवाहिका देण्यात आली यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना धारिया म्हणाले की,पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असुन ग्रामीण भागात अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शिरुर येथील श्री गणेशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ अखिलेश राजुरकर म्हणाले की, ग्रामीण भागात जेव्हा रुग्णांना उपचारासाठी अतितातडीची गरज असते. तेव्हा वेळेत रुग्ण मोठ्या रुग्णालयात पोहोचवणे गरजेचे असते. अशावेळी अद्ययावत सुविधा असणारी रुग्णवाहिका मोलाची भूमिका बजावते. DSM कंपनीने दिलेली रुग्णवाहिका अनेकांना जीवनदान देणारी ठरेल असे यावेळी डॉ.राजुरकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी DSM कंपनीचे अधिकारी पाठक म्हणाले, कंपनीच्या वतीने पर्यावरण जागृती बरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते. सामजिक दायित्व राखत शिरुर सारख्या ग्रामीण भागात रुग्णांना वेळेत हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्यासाठी हॉस्पिटलची गरज ओळखून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, DSM कंपनीचे अधिकारी उदय शेट्टी, संदीप जावळे, पाठक, वनराईचे राकेश शेलार, सी.ए.अभिजित थोरात यांच्या हस्ते श्रीगणेशा हॉस्पिटलचे संचालक डॉ.अखिलेश राजुरकर, डॉ.विशाल महाजन यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले. यावेळी श्री गणेशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ.सारंग पाठक, डॉ.सौरव पाठक, डॉ.प्रणव वाघ,सूरज खरात, शिल्पा झंजाड, शीतल शिंगोटे, अश्विनी कुलकर्णी, सूरज काळे, सुदर्शन साखरे, सतीश सोनवणे यांसह हॉस्पिटलचा स्टाफ, DSM कंपनीचे अधिकारी, वनराई संस्थेचे पदाधिकारी,साम्राज्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.