sambhajiraje-vidyalay-jategaon

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य लोकशाहीचा खरा दिपस्तंभ: पवार

शिक्रापूरः ‘राज्यात प्राथमिक सक्तीचे प्राथमिक शिक्षण, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण कौशल्य शिकविणाऱ्या शाळा तसेच जातीभेदाविरुद्ध लढा, राधा नगरी धरणाची उभारणी, शेती, उद्योग, सहकार क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे शाहू महाराजांचे कार्य आधुनिक लोकशाहीला दिपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक आहे. शेती क्षेत्रात आधुनिकरण व संशोधनाला पाठिंबा देणारे महानायक म्हणून छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे कार्य समाजाला संस्मरणीय आहे,’ असे […]

अधिक वाचा..

शिरुर येथे TDM सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी आज ट्रॅक्टर मोर्चा 

शिरुर (तेजस फडके): निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुचर्चित टीडीएम या मराठी चित्रपटाला थिएटरमध्ये प्राईम टाईम मिळावा व रेग्युलर शो मिळावेत या मागणीसाठी शिरूर मधील चित्रपट रसिक व भाऊराव प्रेमी मित्र मंडळाच्या वतीने आज शनिवार दुपारी 4 वाजता शिरुर येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. 28 एप्रिल रोजी टीडीएम हा मराठी चित्रपट पुण्याह महाराष्ट्रात धडाक्यात प्रदर्शित […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात शेतकऱ्यांना खरीप पूर्व मार्गदर्शन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शेतकऱ्यांना खरीप हंगामात करण्यात येणाऱ्या शेतीसह विविध योजनांची माहिती देत कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे शेतकऱ्यांसाठी खरीप पूर्व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी सहाय्यक अशोक जाधव, कृषी मित्र तानाजी राऊत, प्रगतशील शेतकरी भरत म्हेत्रे, गोपीचंद राऊत, संपत […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये इमारतीचे नुकसान केल्याबाबत गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे एका व्यक्तीच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शेजारील व्यक्तीने अनाधिकाराने प्रवेश करत बांधकामाचे पिलर जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय गुलाब मासळकर या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अधिक वाचा..

कारेगाव येथील गणेश ताठे यांची महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील भाजपा कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ […]

अधिक वाचा..

राज्यात तिसरा पर्याय उभा राहणार; नाथाभाऊ शेवाळे

शिरुर (तेजस फडके): मुंबई येथे प्रागतिक पक्ष महाराष्ट्र यांच्या माध्यमातून प्रतिनिधी संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महाराष्ट्रातील 16 घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, संस्थापक, व आमदार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थित राहून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील घडत असलेल्या राजकीय घटना याविषयी आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेकाप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार भाई जयंत पाटील, […]

अधिक वाचा..

शिरुर विधानसभेचा भाजपाचा उमेदवार कोण?

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर विधानसभेच्या जागेची नेहमीच वेगवेगळी चर्चा होत असून अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीकडे सदर जागा राहिलेली असताना काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाले असल्याने आता पुढील काळात शिरुर विधान सभेचा भारतीय जनता भारतीय उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिरुर विधानसभा मतदार […]

अधिक वाचा..

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या अर्ज मुदतवाढ

ऑनलाईन अर्ज भरण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आवाहन शिक्रापूर (शेरखान शेख): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन २०२२ ते २०२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज करण्यासाठी प्रक्रियेस ३० मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरण्याचे आवाहन समाज कल्याण आयुक्त […]

अधिक वाचा..

शिक्रापुरच्या ग्रंथालयात आता सापांबाबतची पुस्तके

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पुस्तके उपलब्ध शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या भैरवनाथ मोफत वाचनालय मध्ये 17 हजार हून अधिक वेगवेगळी पुस्तके उपलब्ध असताना आता निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाचनालयाला सापांबाबतची पुस्तके भेट देण्यात आल्याने ग्रंथालयात आता सापांबाबतची पुस्तके उपलब्ध झाली आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या भैरवनाथ मोफत वाचनालयमध्ये […]

अधिक वाचा..

शिंदोडी गावची वेदांती वाळुंज राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) राज्यात पहिली

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिंदोडी गावची रहिवासी असणाऱ्या आणि बाभूळसर बुद्रुक या शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी कु वेदांती वैभव वाळुंज हीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) 200 पैकी 200 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वेदांतीला तिच्या वर्गशिक्षिका श्रीमती प्रतिभा […]

अधिक वाचा..