गुनाटच्या प्रज्वल भालेरावचा राज्यात डंका, मंथन परीक्षेत राज्यात तिसरा 

शिरुर (तेजस फडके): राज्यस्तरीय मंथन परिक्षेत शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी प्रज्वल संतोष भालेराव याने ३०० पैकी २९४ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असुन त्याला या परिक्षेसाठी त्याच्या वर्गशिक्षिका सुवर्णा नानासाहेब धुमाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रज्वलच्या या यशाबद्दल अहमदनगर येथील नंदनवन लॉन्स या ठिकाणी प्रज्वल भालेराव याचा […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शरद बँकेजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात असलेल्या शरद बँकेजवळ काही नागरिक आलेले असताना त्यांना एक व्यक्ती मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले. […]

अधिक वाचा..

सणसवाडीत कंपनी कामगारांनी लांबवले चार लाखांचे पार्ट

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील ट्रान्स ऑटो इंटरनेशनल प्रायवेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी एका वाहन चालकाच्या मदतीने तब्बल 4 लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे भिकू बिगुराम चव्हाण, विजय सखाराम पडघन, महेश बाळासाहेब थिटे व शाम लक्ष्मण सूर्यवंशी या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील ट्रान्स […]

अधिक वाचा..

कासारीतील कुटुंब लग्नाला तर चोरट्यांचा घरात डल्ला

दरवाजाचे कुलूप तोडून लांबवला तब्बल चार लाखांचा ऐवज शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील कुटुंब शेजारील मुलीच्या लग्नासाठी कोरेगाव भीमा येथे गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून तब्बल 4 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कासारी (ता. शिरुर) अमित सातपुते […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात आदर्श सरपंच पुरस्काराचे फुटलेय पेव

अर्थाजन करुन मिळवला जातोय “आदर्श सरपंच पुरस्कार”  शिरुर (तेजस फडके): पुर्वी गावचा सरपंच म्हटल की, झुपकेदार व पिळदार मिशा, धोतर, कुर्ता, पायतान, जाकीट, डोक्यावर टोपी अथवा पटका असा पेहराव असलेला भारदस्त व्यक्ती असायचा त्याला गावात राजकीय विरोध असला तरी गावातील सर्वजण त्या व्यक्तीला मान सन्मान आणि त्याच्या शब्दाला किंमत द्यायचे. माञ काळ बदलला तस राजकारण […]

अधिक वाचा..

शिरुर येथील राष्ट्रीय गुणवंत शोध परिक्षेत (NSSE) सर्वज्ञ पवार राज्यात पाचवा 

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील विद्याधाम प्राथमिक शाळा येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी सर्वज्ञ राम पवार हा राष्ट्रीय गुणवंत शोध परिक्षेत (NSSE) 200 पैकी 192 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला वर्गशिक्षिका कांचन शिंदे, आई वैशाली पवार, वडील राम पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वज्ञच्या या यशाचे शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच आबासाहेब जगताप (सरचिटणीस […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे गुजर प्रशालेच्या बावीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

राष्ट्रीय शिष्यवृत्तीस आठ व सारथीसाठी चौदा विद्यार्थी लाभार्थी शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केले असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत 8 तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत 14 विद्यार्थी पात्र ठरलेले असताना यापैकी राष्ट्रीय शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 5 वर्षे दरवर्षी 12 हजार तर सारथी […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत नवनिर्वाचित पोलिसांच्या हस्ते ध्वजारोहण

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 1 मे या महाराष्ट्र दिनी होणारे ध्वजारोहणचा मान हा नुकतेच पोलीस भरतीत यशस्वी होऊन कान्हूर मेसाईचे नाव उज्वल करणाऱ्या अशोक मिडगुले, अमोल मिडगुले, संकेत ढगे, विशाल धुमाळ व गौरव तागड या नवनिर्वाचित पोलिसांच्या हस्ते ध्वजपूजन करत ध्वजारोहण करण्यात आले आहे. कान्हूर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात किरकोळ वादातून युवकांचा हॉटेलमध्ये राढा

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या युवकाचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने युवकांमध्ये वादावादी होत काचेच्या बाटलीने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हॉटेल चालकासह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील ओमसाई हॉटेल मध्ये अभिषेक नाईकनवरे व त्याचा साथीदार विकास काळे हे […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्द मध्ये रात्रीत महिलेला मारहाण करुन ऐवज लंपास

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करत महिलेला मारहाण करुन महिलेला जखमी करत महिलेच्या अंगातील 4 तोळ्याचे दागिने व काही रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील समिंद्राबाई मासळकर […]

अधिक वाचा..