shirur nagar parishad

काय ती शिरूर नगर परीषद, काय ते पैसे खाणारे लोकसेवक…

शिरूर शहरात अनाधिकृत बांधकामांना उत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात गुजर मळा, प्रितम प्रकाश नगर, जोशीवाडी, मुंबई बाजार, रेव्हेन्यू कॉलनी, पवार मळा व शहरातील अनेक ठिकाणी विनापरवाना अनाधिकृतरीत्या बांधकामे सुरू असून, शिरूर नगरपरीषदेची कारवाईस टाळाटाळ करत आहे. शिरूर शहर परिसरात सन २०१७ पासून आजपर्यंत मोठया प्रमाणात सुरू आहेत. शिरूर नगरपरीषदेने फक्त महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचा ऋषिकेश जाधव वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी सीए

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ऋषिकेश सतीश जाधव याने जिद्दीच्या जोरावर यश संपादित करत सिए परीक्षा उत्तीर्ण होत वयाच्या एकविसाव्या वर्षी चार्टर अकाऊंटंट बनण्याचा विक्रम केला असल्याने शिक्रापूर सह परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्वसामान्य कुटुंबातील ऋषिकेश जाधव याचे शिक्षण वाघोली येथील जेएसपीएम विद्यालयातून सुरु झाले. ऋषिकेशचे वडील उच्चशिक्षित असून खाजगी […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील बंधाऱ्यावरुन व्यक्ती गेला दुचाकीसह वाहून

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यावरुन जाणारा एक व्यक्ती दुचाकी सह नदीच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना (दि. १९) रोजी सकाळच्या सुमारास घडली असून दिवसभर शोध कार्य करुन देखील वाहून गेलेल्या व्यक्ती बाबतची काहीही माहिती मिळू शकली नसल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदी पात्रामध्ये मासेमारी करणारा एक व्यक्ती मासेमारी […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसाच्या संस्कार गावडेची नवोदय साठी निवड

शिक्रापूर: पिंपळे खालसा (ता. शिरुर) या महाराष्ट्रातील शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संस्कार अविनाश गावडे या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली असून संस्कारच्या यशामुळे शाळेने यशाची परंपरा कायम राखली. संस्कार गावडे सह त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिक सुशीला माकर व दिनेश निघोजकर यांचा शालेय व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थ व शिक्षकांनी सन्मान केला. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी धुमाळ

शिक्रापूर: शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी संभाजी धुमाळ तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक ज्येष्ठ माजी सैनिक शिवाजीराव कोहोकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी सैनिक संघटनेच्या शिरुर तालुकाध्यक्ष पदी संभाजी धुमाळ, […]

अधिक वाचा..
eye

कान्हूरच्या विद्याधाममध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर…

शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (ता. २०) मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी होणार आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी दिली. कान्हूर मेसाई (ता. शिरुर( येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रोटरी क्लब ऑफ पुना […]

अधिक वाचा..

सार्वजनिक बांधकाम विभागाची नामी शक्कल; काय ती पाहा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण ते आमदाबाद -रामलिंग रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असून अनेक अपघात या रस्त्यावर होत आहे. वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळया पुर्वीच हे खड्डे बुजवणे आवश्यक होते. परंतु, हे खड्डे आता मुरूम टाकून बुजवले जात असून रोलर न वापरल्याने मुरुमातील दगड रस्त्यावर आल्याने वाहनाचे टायर फुटून, घसरून अपघात होत आहेत. पावसाळ्यापुर्वी खड्डे […]

अधिक वाचा..

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने संकष्ठी चतुर्थीचे औचित्य साधून पहाटे च्या सुमारास अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी दर्शानास खुले करण्यात आले. संकष्ट चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या. शनिवार (दि १६) रोजी संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक, […]

अधिक वाचा..

विकास पाटील व निखिल रावडे यांना बहिर्जी नाईक पुरस्कार प्रदान

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले पोलिस नाईक विकास पाटील व पोलीस शिपाई निखिल रावडे यांना नुकताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते बहिर्जी नाईक हा पुरस्कार प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन मधील गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले पोलिस […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील धोकादायक बंधाऱ्याची प्रशासनाकडून पाहणी

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ नगर जवळील वेळनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची तसेच संरक्षक कठड्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून सदर ठिकाणी दुरुस्तीची मागणी नागरिक करत असताना प्रशासनाकडून नुकतीच येथील धोकादायक बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ नगर जवळील वेळनदीवरील बंधाऱ्याची मोठी दुरावस्था झाली होती. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र […]

अधिक वाचा..