सार्वजनिक बांधकाम विभागाची नामी शक्कल; काय ती पाहा…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण ते आमदाबाद -रामलिंग रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असून अनेक अपघात या रस्त्यावर होत आहे. वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळया पुर्वीच हे खड्डे बुजवणे आवश्यक होते. परंतु, हे खड्डे आता मुरूम टाकून बुजवले जात असून रोलर न वापरल्याने मुरुमातील दगड रस्त्यावर आल्याने वाहनाचे टायर फुटून, घसरून अपघात होत आहेत.

पावसाळ्यापुर्वी खड्डे न बुजवता खड्डे बुजवण्याची बिले सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली असल्याची चर्चा नागरीक करत आहे. तात्पुरती मलमपट्टी करुन वाहनचालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश जामदार, मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी केली आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

मलठण गावठाणातील बाजार ओटयाजवळील सिमेंट रस्त्यालगत सांडपाण्याचे मोठे गटार केले असून, अद्याप ते बंदिस्त केले नसून या उघडया व खोल गटारांमुळे वारंवार अपघात होऊन नागरीक जखमी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून तात्काळ हे गटार बंदीस्त न केल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा माजी सरपंच नाना फुल सुंदर यांनी दिला आहे.

बातमीचा दणका; पुणे-नगर महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवले