crime

शिरुर तालुक्यात ऊसतोड कामगार पुरवताना केली चक्क १५ लाखांची फसवणुक

क्राईम

शिरुर (अरुणकुमार मोटे): ऊसतोडीसाठी निलेश पवार यांना एक वर्षासाठी ऊस कामगार पुरवतो. त्यापोटी बॅक अंकांऊंटवर तब्बल १५ लाख घेऊन आरोपी सचिन रुपचंद पवार रा. चाळीसगाव, जिल्हा – जळगाव याने फक्त महीनाभर कामगार पुरवले व परत पैसे न देता तो कामगारांसह पैसे बुडवून पसार झाला आहे. त्याबाबात फिर्यादी निलेश आप्पासाहेब पवार, रा. चिंचणी, (ता. शिरुर) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. १७) ऑगस्ट ते (दि. २९) नोव्हेबंर रोजीचे ७ वाजेपर्यंत आरोपी सचिन रूपचंद चव्हाण, रा. चाळीसगांव, ता. चाळीसगांव, जि. जळगांव याने मी तुम्हाला एक वर्षासाठी खात्रीने उसतोड कामगार पुरवितो त्याबदल्यात कामगारांना 15 लाख रुपये रक्कम दयावी लागेल, असे सांगून ती रक्कम विश्वासाने निलेश पवार याच्याकडून त्याचे एच.डी.एफ.सी. बँक अकाउंट नं. 10079985163 यावर पाठविण्यास सांगीतली.

निलेश पवार याने अँक्सीस बँक शाखा शिरुर, येथील अकाउंट नं. 921010039565586, बँक ऑफ इंडीया शाखा न्हावरा येथील अकाउंट नं. 061110110012218, व एच.डी.एफ.सी. बँक शाखा शिरूर येथील अकाउंट नं.50100073120411 यावरुन फिर्यादीकडून घेवून त्याबदल्यात फक्त एक महिना फिर्यादीकडे उसतोड केली व एक महिण्यानंतर रक्कम फिर्यादीला परत न देता विश्वासघाताने आर्थिक फसवणुक करुन परस्पर फिर्यादीला न सांगता कामगारांना घेवून पळून गेला आहे. पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस ऊपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.