‘रांजणगाव मॅरेथॉन’ साठी उरले फक्त पाचच दिवस अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या हस्ते उदघाट्न 

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) आर एम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता ‘रांजणगाव मॅरेथॉन’ 2022 या स्पर्धेचे आयोजन रांजणगाव गणपती येथे होत असून या स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन सिनेअभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत २ लाखांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ‘महागणपती फाउंडेशन’ यांचेही सहकार्य राहणार आहे. शिरुर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असून हि स्पर्धा सर्वसमावेशक असल्याने या स्पर्धेत शिरुर तालुक्यातील सर्व नागरीकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहील असा विश्वासही उद्योजिका शोभाताई धारीवाल यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेमध्ये पुढीलप्रमाणे वयोगट, अंतर व बक्षीसे आहेत.

18 वर्षांपुढील वयोगट (मुले व मुली) 10 किमी धावणे प्रथम 9000 रुपये, द्वितीय 7000 रुपये, तृतीय 4000 रुपये,

18 ते 35 वयोगट (मुले व मुली)

5 किमी धावणे प्रथम 7000 रुपये, द्वितीय 4000 रुपये, तृतीय 2000 रुपये,

35 ते 50 वयोगट (पुरुष व महिला)

5 किमी धावणे प्रथम 7000 रुपये, द्वितीय 4000 रुपये, तृतीय 2000 रुपये.

10 ते 14 वयोगट (मुले व मुली)

5किमी धावणे प्रथम 4000, द्वितीय 3000, तृतीय 2000 रुपये

१५ ते १७ वयोगट (मुले व मुली) 

3 किलोमीटर धावणे प्रथम ४००० रुपये, द्वितीय 3000 रुपये, तृतीय २००० रुपये

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३ किलोमीटर अंतरासाठी 300 रुपये, 5 किमी अंतरासाठी 400 रुपये व 10 किमी अंतरासाठी 500 रुपये प्रवेश शुक्ल आकारण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांसाठी टी-शर्ट, सहभाग प्रमाणपत्र, मेडल, चेस्ट नंबर, नाष्टा दिला जाणार आहे.

रांजणगाव मॅरेथॉन स्पर्धेचे ऑफलाईन रजिस्ट्रेशन सुरू

आर एम धारीवाल फाउंडेशन व महागणपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणगाव गणपती येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे येत्या रविवारी (दि 11) डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागासाठी शेवटचे 4 ते 5 दिवस राहिलेले असून ज्या स्पर्धकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी अडचणी आल्या व ज्यांचा सहभाग घ्यायचा राहिला आहे. त्यांच्यासाठी हि शेवटची संधी असणार आहे असे आयोजक सागर पाचुंदकर यांनी सांगितले. स्पर्धेचे रजिस्ट्रेशन राजमुद्रा चौक येथे मॅरेथॉनच्या ग्राउंडवर चालु आहे. तेथे जाऊन प्रत्यक्ष फार्म भरावा किंवा 9595689696 या नंबरवर संपर्क साधावा. तसेच रांजणगाव मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 9595689696 आणि 9657663383 या नंबरवर संपर्क करावा. तसेच Online Registration साठी https://www.townscript.com/e/ranjangaon-marathon-2022-234204 या लिंकवर क्लिक करा.