शिरूरमध्ये एस.टी बसमध्ये चढत असताना जबरी चोरी

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एस.टी स्टॅण्डमध्ये एक महिला व तिचे पती पुणे येथे जाण्यासाठी आलेल्या एस.टी.मध्ये चढत असताना रेटारेटी करुन महीलेसह तीनजणांनी ८० हजार 500 रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत फिर्यादी संगीता रामदास सुरासे (वय ४४) रा. इचलकरंजी लक्ष्मीनगर गल्ली नं. ३ ता. इचलकरंजी जि. कोल्हापुर यांनी आरोपी निकेश गफुर भोसले, महीला काटया निकेष भोसले इसरांत्या विजय काळे यांच्यावर जबरी चोरीप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की (दि. २७) जानेवारी रोजी सायंकाळी ०५.३०वा. सुमारास मौजे शिरूर गावचे हददीत शिरूर एस.टी. बस स्टॅन्ड येथे संगिता सुरासे व तिचे पती असे पुणे येथे जाणेकरीता एस.टी. बसमध्ये चढत असताना तेथे आरोपी १) निकेश गफुर भोसले २). काटया निकेष भोसले (वय २२) दोघे रा. पाण्याची टाकी शिरूर ता. शिरूर जि.पुणे ३) इसरांत्या विजय काळे रा. पाण्याची टाकी शिरूर (ता. शिरूर) जि. पुणे. असे यांनी त्यांच्याकडे भिक मागण्याकरीता दोन लहान पोर पाठवुन भिक मागण्याचा बहाना करून ते एस.टी. बसमध्ये चढत असताना गर्दीत वरील तिघांनी संगणमत करून फिर्यादी सांगिता सुरासे जवळ येवुन रेटारेटी करून इसरांत्या विजय काळे याने हातातील पर्स जबरीने हिसकावुन त्यामधील ८0 हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागीने व साहीत्याची चोरी करून पुढे पळुन गेला व त्यास पकडत असताना १ ) निकेश गफुर भोसले व महीला २ ). काटया निकेष भोसले दोघे यांनी संगिता सुरासे हिला अडवुन त्यास पळून जाणेस मदत केली आहे.

त्यातील क्रं १ व २ यांना तेथील नागरीकांनी पकडल्याने त्यांची नावे समजली म्हणुन तिघांविरूध्द कायदेशिर फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस ऊपनिरीक्षक विक्रम जाधव हे करत आहे.