बिबटयाने घेतला युवतीचा बळी, कर्मचारी मात्र लाच घेण्यात दंग, लाचलुचपत विभागाची कारवाई

क्राईम

शिरुर (अरुणकुमार मोटे): पारोडी (ता. शिरुर) येथील रेवणनाथ सातकर यांची वन विभागाने पकडलेली गाडी सोडविण्याकरीता तसेच पुन्हा कारवाई न करण्याकरीता शिरुर वनक्षेत्रीय कार्यालयाचे प्रविण क्षिरसागर यांनी रेवणनाथ सातकर यांच्याकडून 10 हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यांच्याकडून दहा हजार रुपये स्वीकारले आहे. पुणे येथील लाचलुचपत विभागाने त्यांना शिरुर येथे लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

याबाबत पारोडी येथील रेवणनाथ सातकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन लाचलुचपत विभागाचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक भारत साळुंखे हे पुढील तपास करत आहेत.
एकीकडे शिरुर तालुक्यात बिबटयाने माणसांवर हल्ला करून ठार मारल्याची घटना ताजी असताना वेळेवर घटनास्थळी न पोहचणारे वनविभागाचे कर्मचारी मात्र लाच घेण्यात गुंग असल्याचे दिसून येत आहे. शिरुर तालुक्यातील बेट भागात बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी जात असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांला लाच घेताना रांगेहाथ पकडल्याने सर्वसामान्य जनतेतुन तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.