arrest

भारतामधील शेकडो व्यवसायीकांना फसविणाऱयाला शिरूरमधून अटक

क्राईम

पुणेः भारतामधील शेकडो एलिव्हेटर (लिफ्ट) व मार्बल व्यवसायीकांना फसविणा-या तोतया डॉक्टर सायबर गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

बंडगार्डन पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. १६१ / २०२२ भा. द. वि. कलम ४१९, ४२०, ३४, माहिती तंत्रज्ञानकायदा क-६६ (डी) मधील फिर्यादी विठ्ठल गजानन भोसले (वय ४८ वर्षे, धंदा- लिप्ट बसवणे, रा. टिंगरेनगर रोड नं. ६, पुणे) यांना मो. नं. ८४४६५१०५८८ व ७४१०७८०२६८ वरुन अनोळखी व्यक्तीने कॉल करुन तो ऑरेंज सिटी हॉस्पीटल, तळेगाव दाभाडे, पुणे येथून अॅडमिनीस्ट्रेशन ऑफिसर डॉ. तेजस शहा बोलत असल्याचे सांगितले. त्यांचे हॉस्पीटल मध्ये लिप्ट बसविण्याची खोटी माहिती सांगीतली व लिफ्ट बसविण्यासाठीचे कोटेशन त्याचे ई मेल- orangecityhospital5@gmail.com वर पाठविण्यास सांगून नंतर टेंडर पास झाल्याचे सांगितले. टेंडरची फी व टेंडरसाठी ई.एम.डी. (Earnest Money Deposit ) त्याचे बँक अकाऊंटवर भरण्यास सांगून फिर्यादीची एकूण ५६,४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. सदरबाबत बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

unique international school
unique international school

सदर गुन्ह्याचा तपास बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर हे करीत आहेत. दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीने फिर्यादीस फोन केलेले मोबाईल नंबर हे दुस-या महिलांचे नावावर होते. तसेच त्याने स्विकारलेले पैसे हे दुस-या व्यक्तीचे नावे असलेल्या बँक अकाऊंट मध्ये ट्रान्सफर करुन घेतल्याने आरोपीचा शोध घेण्यामध्ये अडचणी येत होत्या. परंतु, बंडगार्डन पोलिसांनी मिळालेले मोबाईल नंबर, ईमेल आयडी याबाबत संबंधीत मोबाईल कंपनी व जी- मेल यांचेकडून माहिती घेऊन त्याचे तांत्रिक विश्लेषन करुन यातील आरोपी तेजस अशोक शहा (वय ३७ वर्षे रा. बाभुळसर रोड, आशापुरा किराणा स्टोअर समोर, मंदा केशव फंड यांचे घरी, कारेगाव, ता. शिरुर जि. पुणे. मुळ गाव- स. नं.१११९/४ अ, नगरपट्टी, जुने धुळे ता. जि. धुळे) याला कारेगाव ता. शिरुर जि. पुणे येथून ताब्यात घेतले. ११/०७/२०२२ रोजी ००:०५ वा. अटक केली आहे.

सदर आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये आत्तापर्यंत त्याने भारतामधील अनेक राज्यातील सुमारे ५० ते ६० एलीव्हेटर व मार्बल व्यवसायीकांना फसविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने १०० हुन अधिक व्यवसायीकांशी संपर्क साधला असल्याने सदरचे आरोपीने तपासामध्ये सांगीतले. त्याने फसवणुक केलेल्या व्यवसायीकांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. सदर आरोपीचे विरुद्ध यापुर्वी पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला एकूण ०९ गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास आपण तात्काळ सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर किंवा संबंधीत पोलिस स्टेशन येथे
तक्रार दाखल करावी.

संबंधित कारवाई राजेंद्र डहाळे, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, सागर पाटील, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२, आर. एन. राजे, सपोआ लष्कर विभाग, पुणे, प्रताप मानकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व अश्विनी सातपुते, पोलिस निरीक्षक (गुन्हे), बंडगार्डन पोलिस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राहुल पवार, स्टाफ रामदास घावटे, सागर घोरपडे, किरण तळेकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांनी केली आहे.