Crime

शिक्रापुरातून चक्क चारचाकी कारची चोरी: गुन्हे दाखल

क्राईम

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीतून वारंवार दुचाकी वाहने चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडत असल्याने नागरिक हैराण झालेले असताना आता चक्क चारचाकी इंडिका कारची चोरी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती या ठिकाणी राहणारे नितीन चाकने यांनी (दि. ६) ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची एम एच १४ बी ए १६७३ ही इंडिका कार घरासमोरील मोकळ्या जागेत लावून झोपले होते. सकाळच्या सुमारास चाकने हे घराबाहेर आले असताना त्यांना त्यांनी घरासमोर लावलेली कार दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला तसेच परिसरात कारची पाहणी केली असता कार कोठेही आढळून आली नसल्याने आपली कार चोरी गेली असल्याचे चाकने यांच्या लक्षात आले.

याबाबत नितीन गोपीनाथ चाकने (वय ३९) पाट वस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष मारकड हे करत आहे.