Shirur Police Station

शिरुर शहरात जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

क्राईम

शिरुर: शिरूर शहरात अनेक ठिकाणी अवैधरीत्या जुगार, मटका खेळत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत लागताच पोलिसांनी अचानक छापा टाकत टाकला. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले असून, दोन जण पळून गेले आहेत. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात गोपनीय पोलिस अंमलदार राजेंद्र पोपट गोपाळे यांनी फिर्याद दिली आहे. पाच जणाविरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 अ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना खबऱ्या मार्फत शिरुर शहरातील कामाठीपुरा येथे अवैध जुगार क्लब चालू असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच राऊत यांनी तत्काळ उपनिरीक्षक उगले, सहायक फौजदार नाजीम पठाण, पोलिस अंमलदार राजेंद्र गोपाळे व दोन पंच यांचे पथक तयार करून छापा मारण्याची सूचना केली होती.

hotel matoshree ranjangaon ganpati

रविवारी (ता. १७) दुपारी अडीचच्या सुमारास माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता १) दाऊद ईस्माईल शहा (रा. शनिमंदीर), २) पवन झुंबरलाल कोठारी (रा. आनंद सोसायटी रामलिंगरोड), ३) मनोहर जयवंत मस्के (रा. बुरुडआळी), ४) बबलु सय्यद (रा. बुरुडआळी), ५ ) पिनु गंगावणे (रा. कामाठीपुरा) हे सर्वजण बेकायदा जुगार खेळत असताना सापडले. त्यावेळी दाऊद शहा, पवन कोठारी, मनोहर मस्के या तिघांना पोलिसांनी जागेवरच अटक केली. परंतु, बबलू सय्यद आणि पिनू गंगावणे हे पळून गेले आहेत. शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिक नाईक शिंदे हे करत आहेत.