शिरुर पोलिसांची गुटख्याची वाहतुक करणाऱ्यांवर सलग दुसऱ्यांदा कारवाई

क्राईम

Shirur police action against Gutkha traffickers for the second time in a row

शिरुर (अरुणकुमार मोटे): अहमदनगर मधुन पांढऱ्या चारचाकी गाडीत अवैधरित्या गुटखा शिरुरला येत असल्याची माहीती खबऱ्या मार्फत मिळाल्याने शिरुर पोलिसांनी या गुटखा वाहतुक करणाऱ्या गाडीला अहमदनगर ते पुणे महामार्गावर हॉटेल सम्राट समोर सापळा लावून तीन जणांना ताब्यात घेत ३२ हजार १२८ रुपये किमंतीचा गुटखा आणि ३ लाख रुपये किंमतीची ह्युंडाई कंपनीची आय २० कार नं. एम. एच. १४ एफ.जी. ९८९६ असा एकुण ३ लाख ३२ हजार १२८ रुपयांचा माल जप्त केलेला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खबऱ्याने माहिती दिली की पांढ-या रंगाच्या ह्युंडाई आय २० कार नं एम एच १४ एफ जी ९८२६ या कारमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतुक होत असुन ती कार अहमदनगर वरुन पुणे येथे जात असल्याची खात्रीशीर माहीती पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांना मिळाल्याने त्यांनी याबाबत पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना माहिती दिली. त्यानंतर राउत यांनी तातडीने एक पोलीस पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

अहमदनगर ते पुणे महामार्गावर हॉटेल सम्राट समोर पोलीस पथक सापळा लावुन थांबलेले असताना, बातमी मिळालेल्या वर्णनाची एक पांढ-या रंगाची ह्युंडाई कंपनीची आय २० कार नं एम एच १४. एफ जी ९८९६ आल्याने पोलिसांनी ती गाडी थांबवत पंचासमक्ष गाडीची पाहणी केली असता. त्यामध्ये तीन जण बसलेले होते. त्या कारची पाहणी केली असता त्यात अवैधरीत्या गुटखा आढळुन आल्याने १) नितीन हिरालाल छाजड (वय ५६) रा.सेक्टर ३५/३ शितल लॉन्ड्रीसमोर, आकुर्डी, पुणे ३५ २) संगमेश माणिकाप्पा हलगे (वय ३४) रा. मनिका आनंदवाडी, मिस्खल, बिदर, कर्नाटक सध्या रा. सेक्टर १६, ओसिस परदेशी सोसायटी, जाधववाडी, चिखली, पुणे ३५ यांना अटक करण्यात आली असुन याबाबत पोलीस अंमलदार टी टी जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे.

या आरोपी विरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना दि 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केलली असुन या गुन्हयाचा पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे आणि शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, सहायक फौजदार जी. एन. देशमाने, पोलिस नाईक बाळु भवर, विनोद काळे, राजेंद्र गोपाळे आणि टी. टी. जाधव या टिमने केली आहे.