ranjangaon midc police

रांजणगाव एमआयडीसी कंपनीत लाखो रुपयांची चोरी करणारे मुद्देमालासह अटकेत…

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील डॉंगकॉंग कपंनीत २६ जुन २०२२ रोजी अज्ञात आरोपींनी १० लाख रुपयांची चोरी केली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्याकडे होता. त्यांनी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना आरोपींना शोधून काढत मुद्देमालासह अटक केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉनकाँग कपंनीत २६ जून रोजी रात्री ११.४५ च्या दरम्यान अज्ञात आरोपीने कंपीनीच्या कपांऊंडवरुन उडी मारुन कंपनीत प्रवेश करत कपंनीच्या टूलरुम मधील किमती माशीनचे ९ लाख ९२ हजार ६२५ रुपयांचे पार्ट चोरुन नेले होते. याच अनुषंगाने कंपनीचे एच आर मंगेश नारायण देशमुख यांनी ७ जुलै रोजी रांजणगाव एमआयडीस पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

सदर गुन्ह्याच्या तपासात पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मागदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोंद शिंदे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विजय सरजिने, विलास आंबेकर, संतोष औंटी, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ यांच्या टिमने या गुन्हयातील अज्ञात आरोपींचा गोपनीय माहितीच्या आधारे छडा लावला. कंपनीत चोरी करणारा रोशन आशेकराव मेश्राम (रा. वर्धा) आणि त्यास मदत करणारा आरोपी संजय रामकिसन तोतरे (सध्या रा. रांजणगाव गणपती) यांना तसेच सदर गुन्हयातील चोरीचा माल बाळगणारे त्यांचे साथीदार रुपेश देवानंद गुरुतकर (रा. रांजणगाव गणपती) आणि कैलास अंगत मुंडे (रा. चिखली, पाटीलनगर) यांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी ८ लाख ६ हजार ९९९ रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक नितेश गटटे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मागदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोंद शिंदे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विजय सरजिने, संतोष औटी, विलास आंबेकर, पोलिस अंमलदार विजय शिंदे, उमेश कुतवळ यांच्या पथकाने केली आहे.