शिरुरमध्ये नाकाबंदी करत असताना पोलिसांना फायनांस वसुली एजंटच्या गाडीमध्ये सापडली तलवार….

क्राईम मुख्य बातम्या

भारतीय हत्यार कायदा कलम- 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील पाबळफाटा परीसरात शिरुर पोलिस नाकांबदी करत वाहनांची तपासणी करत असताना पोलिस शिपाई शेखर झाडबुके यांना आरोपी अक्षय संजय जगदाळे (वय २८) व्यवसाय – फायनास वसुली एजंट, रा. मु.पो. पारनेर, ता. पारनेर जि. अहमदनगर. याच्या गाडीमध्ये लोखंडी पात्याची धारदार तलवार सापडली असून त्याच्यावर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. १५) जानेवारी रोजी ०७:३० वा. चे सुमारास मौजे शिरुर गावचे हद्दीत पाबळफाटा येथे चौकात नाकाबंदी दरम्याण वाहनांची तपासणी करत असताना पोलीसांना कार नं. एम.एच.१४.डी.एक्स. ७६७८ ची तपासणी करीत असताना कार चालक नामे अक्षय संजय जगदाळे हयाने त्याच्या ताब्यातील कार क्रं.एम.एच.१४.डी.एक्स.७६७८ चे डिकीमध्ये बेकायदेशील रित्या तलवार बाळगलेली असताना तो मिळुन आला आहे. पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक शिंदे हे करत आहेत.