मुंबादेवीचा गणराज ठरतोय दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा विघ्नहर्ता…

मनोरंजन

मुंबई: गणपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. तसेच कोणत्याही कामाची सुरुवात करताना गणेश पूजा केल्याने विघ्न दूर होते. त्यामुळे त्यास विघ्नहर्ता असे देखील म्हणतात. या व्यतिरिक्त गणपतीला विद्येचा दैवत असे देखील संबोधतात. हा विद्येचा देवता सी पी टॅंक येथे ‘मुंबादेवी चा गणराज’ म्हणून प्रसिध्द आहे.

परमानंद वाडी बाळ मित्र मंडळा मार्फत बसविण्यात येणारा हा बाप्पा विद्या दान या नावाने गेली चार वर्ष दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वाटा उचलत आहे.

लॉकडाऊन नंतर 2 वर्षांनी आपण गणेशोत्सव साजरा करतो आहे. त्यामुळे उत्सवाचा जल्लोष आणि सामाजिक बांधिलकीची सांगड घालत शैक्षणिक सेवा पुरविण्याचे कार्य यंदा बाप्पा मुंबईचा यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ करत आहे. विद्या दान हे सर्वतोपरी दान असून या गणेशोत्सवामार्फत वंचित घटकातील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येते.